सुरवाडा ता. बोदवड(सुवर्ण दिप वृत्तसेवा) दि.04/06/23 पासून दहा दिवसाचे बोदवड तालुक्यातील सुरवाडा येथे भारतीय बौद्ध महासभा बोदवड तालुक्याच्या वतीने महिला उपासिका शिबिराला सुरवात झाली.सदर शिबीर भारतीय बौद्ध महासभा जिल्हा जळगांव पूर्व याच्या आधीपात्या खाली भरविण्यात आले या शिबिराचे उदघाटन जिल्हा अध्यक्ष शैलेंद्र जाधव यांच्या हस्ते करण्यात आले तर दहा दिवस शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक केंद्रीय शिक्षिका वैशाली सरदार हे राहणार आहेत.[ads id="ads1"]
शिबीर उदघाटन वेळी प्रमुख उपस्थिती मध्ये जिल्हा पर्यटन सचिव बी. के. बोदडे, बोदवड तालुका अध्यक्ष अशोक तायडे, एस. पी जोहरे, केंद्रीय शिक्षक प्रकाश सरदार, शांताराम मोरे,मनोहर सुरवाडे, तर शिबिरात सहभागी होण्याकरिता निर्मला सुरवाडे, अश्विनी सुरवाडे, शालुबाई जवरे, मीराबाई गायकवाड, संगीता निकम, केशरबाई बावस्कर, सुशीलाबाई गायकवाड त्याच प्रमाणे मातारमाई महिला बचत गट, आई भीमाई महिला बचत गट अश्या एकूण साठ महिलांनी नावे नोंदणी केली.[ads id="ads2"]
हे 4 जून पासून दहा दिवस राबविण्यात येणार आहे. हे शिबीर घडवून आणण्यासाठी सुरवाडा येथील मनोहर सुरवाडे तसेच बौद्ध पंच मंडळ, निळे वादळ ग्रुप यांनी परिश्रम घेतले.