साक्री (अकिल शहा)भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या कालावधीस नऊ वर्ष पूर्ण झाल्यामुळे भारतीय जनता पक्षातर्फे मोदी @9 महासंपर्क अभियान संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे. त्यानुसार नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या दोन दिवशीय दौऱ्यावर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महामंत्री श्री. कैलास विजय वर्गीय हे आले होते. त्याप्रसंगी साक्री तालुक्याच्या भेटी प्रसंगी आले असता त्यांचे धुळे जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती तथा साक्री तालुक्याचे युवा नेते हर्षवर्धन दहिते यांच्या नेतृत्वाखाली निजामपूर येथे भव्य स्वागत करण्यात आले. [ads id="ads1"]
याप्रसंगी निजामपूर ते साक्री बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी हजारो भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झालेले होते. कैलास विजय वर्गीय यांच्यासोबत आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित, खासदार डॉक्टर हिनाताई गावित, उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी विजय चौधरी, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, आमदार जयकुमार रावल उपस्थित होते. याप्रसंगी हर्षवर्धन दहिते यांनी कैलास विजय वर्गीय यांना भव्य पुष्पहार घालून त्यांना नांगरधारी बळीराजाची प्रतिकात्मक भेट वस्तू देण्यात आली. [ads id="ads2"]
तसेच साक्री शहरात धुळे बायपास ते गोल्डी चौकापर्यंत फटाक्यांचे आतषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात प्रचंड मोठ्या प्रमाणात जेसीबी यंत्रावरून पुष्पवृष्टी करून भव्य दिव्य अशी भव्य बाईक रॅली काढण्यात आली. याप्रसंगी कैलास विजय वर्गीय हे एवढे भव्य दिव्य स्वागत पाहून अक्षरशः भारावून गेले. यावेळी नंदुरबार लोकसभा प्रमुख तथा धुळे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष तुषार रंधे, साक्री तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर बन्सीलाल बाविस्कर, साक्री नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष बापूसाहेब गीते, बांधकाम समितीचे सभापती एडवोकेट गजेंद्र भोसले, महीर चे सरपंच रमेश भाऊ सरक, जिल्हा परिषद सदस्य विजय ठाकरे, दीपक भारुडे म्हसाई माता ट्रस्टचे अध्यक्ष लक्ष्मीकांत शाह, पंचायत समितीचे माजी सदस्य वासुदेव बदामे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ऋतुराज ठाकरे, लादुसिंग गिरासे, राजेंद्र शाह, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता इंजिनियर के.टी. सूर्यवंशी, मोदी @9 चे संयोजक वसंतराव बच्छाव, साक्री तालुका विधानसभा प्रमुख मोहन सूर्यवंशी, निजामपूर चे माजी सरपंच अजितचंद्र शाह, पंचायत समितीचे माजी गटनेते उत्पल नांद्रे, भाजपाचे तालुका सरचिटणीस प्रदीप कुमार नांद्रे, साक्री तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, पंचायत समिती सदस्य ललित सोनवणे, धमनार चे माजी सरपंच दिनेश सोनवणे, म्हसदी चे सरपंच कुंदन देवरे, देगावचे उपसरपंच सुधीर अकलाडे, साक्री चे नगरसेवक दीपक वाघ, भाजपा ओबीसी मोर्चा चे तालुकाध्यक्ष महेंद्र देसले, भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक शिवाजी देवरे, अष्टाने विकासो चे संचालक प्रवीण देवरे, सामोडे चे उपसरपंच सचिन शिंदे, पंचायत समितीचे माजी सदस्य रावसाहेब घरटे, शेणपुर ग्रामपंचायतचे गटनेते सागर काकुस्ते, काकांनी ग्रामपंचायतचे गटनेते सचिन बेडसे, मनीष गीते बंडू गीते अतुल दहिते, सतीश पगार, जितेंद्र सोनवणे, प्रतापपूर चे माजी सरपंच धनराज गांगुर्डे आधी प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.