शेवाळीत ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालया तर्फे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

 


धुळे (अकिल सादिक शहा)  जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील शेवाळी(दा.)येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात 21 जून ला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी योगविषयीचे महत्त्व विशद करण्यात आले. संयुक्त राष्ट्र संघाने सन 2015 पासून जगभरात हा दिवस योग दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले.  योगसाधनेचे मूळ उगमस्थान भारत देश आहे आणि ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंत योगाचे महत्व पटवून देणे ही काळाची गरज आहे आणि म्हणूनच 21 जून हा उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. [ads id="ads1"]

  तर दक्षिण गोलार्धातील हा दिवस सर्वात लहान असतो. त्यामुळे जगभरातील अनेक भागामध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. परंतु याच दिवशी सूर्याचे दक्षिणायन सुरू होते आणि याच दिवशी सर्वात पहिला योगी म्हणून गणला जाणाऱ्या शंकराने योगविषयीचे ज्ञान जगासमोर आणले. म्हणून 21 जून हा आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य दिन साजरा करण्यात येतो. [ads id="ads2"]

  यावेळी सर्व माता-भगिनी यांचे शारीरिक व्यायाम व उत्तेजक हालचाली आणि योगासने प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या कविता दीदी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व  विविध योगासने व प्राणायम याबाबत उपयुक्त माहिती दिली; तसेच योगासनांची प्रात्यक्षिक करून दाखवित उपस्थितांकडून करवूनही घेतली. या वेळी प्रभाकर साळुंखे, धनाजी साळुंखे, सुरेश साळुंके गबाजी साळुंके व तसेच सर्व माता-भगिनी उपस्थित होत्या

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️