शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात काँग्रेस पक्षाच्या शिक्षक पदवीधर /आमदारांची समिती गठीत; समितीचे समन्वयक म्हणून साक्री तालुक्याचे भूमिपुत्र प्राध्यापक प्रकाश सोनवणे यांची नियुक्ती


साक्री (अकिल शहा): राज्यातील सर्व स्तरावरील शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रदेश काँग्रेस तर्फे काँग्रेसचे शिक्षक व पदवीधर आमदारांची समिती स्थापन करण्यात आली असून या समितीचे अध्यक्ष म्हणून प्रदेश अध्यक्ष मा. आ.नानाभाऊ पटोले असतील तर या समितीचे समन्वयक म्हणून प्रदेश शिक्षक विभागाचे अध्यक्ष प्रा.प्रकाश सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. [ads id="ads1"]

  प्रा.प्रकाश सोनवणे याना या समितीचे समन्वयक*म्हणून प्रांताध्यक्ष मा.आ. नानाभाऊ पटोले यांनी आज दिनांक १३ जून २०२३ रोजी प्रदेश कार्यालय टिळक भवन येथे नियुक्ती पत्र दिले.या समितीत मा.आ. व माजी शिक्षण मंत्री व अध्यक्ष मु.वि.काँ. क. प्रा.वर्षाताई गायकवाड, माजी शिक्षण मंत्री प्रा.वसंतराव पूरके, मा.आ.अभिजित वंजारी, मा.आ. किरण सरनाईक, मा.आ.जयंतराव आजगावकर, मा.आ.धीरज लिंगाडे व मा.आ.सुधाकर अडबले यांचा समावेश आहे.   [ads id="ads2"]                            

  प्रा. प्रकाश सोनवणे वरील सन्माननीय समिती सदस्य आमदारांशी वेळोवेळी समन्वय साधणार व शिक्षकांचे प्रशासंदर्भात प्रदेश काँग्रेस कार्यालयात माननीय नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठका आयोजित करून मंत्रालय स्तरावर शिक्षण सचिव, शिक्षण मंत्री ,मुख्यमंत्री यांच्याकडे शिष्टमंडळाचे रूपाने शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी" दबाव गट" म्हणून काम पाहणार आहे तसेच महाराष्ट्रातील सर्व स्तरावरील शिक्षकांची ही समिती संपर्कात त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करील अशी माहिती प्राध्यापक प्रकाश सोनवणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

 प्रा. प्रकाश सोनवणे हे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील शेवाळी(दा.) येथील भूमिपुत्र असून गावातील सर्वसामान्य परिवारातील प्रा.सोनवणे यांची नेमणूक झाल्यामुळे शेवाळी गावासह धुळे जिल्ह्यातील नागरिकांकडून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला केला जात आहे व तसेच राज्यभरातील शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी आधीही नेतृत्व केले आहे(विना अनुदानित शिक्षक,आयसीटी संगणक शिक्षक, अपंग यूनिट) त्यामुळे त्यांच्या  या नियुक्तीमुळे प्रलंबित असलेले शिक्षकांचे प्रश्न सुटतील अशी अपेक्षा राज्यभरातील सर्व शिक्षक वर्ग करीत आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️