शेवाळी(दा.) येथे जिल्हा परिषद डिजिटल शाळा एकलव्य चौक शाळेत "शाळा पूर्वतयारी" उपक्रम उत्साहात संपन्न


साक्री(प्रतिनिधी) धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील शेवाळी येथील जिल्हा परिषद डिजिटल शाळा एकलव्य चौक शाळेत "शाळा पूर्वतयारी" उपक्रम आयोजित करण्यात आला होता. बालकांना शाळेची आणि ओघाने शिक्षणाची गोडी लागावी यासाठी शाळेत येणाऱ्या पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.[ads id="ads1"]

   इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेत पुस्तक वाटप करण्यात आले. शाळा बाह्य विद्यार्थ्यांसाठी जनजागृती म्हणून विद्यार्थ्यांकडून ढोल वाजवीत गावात मिरवणूक काढून जनजागृती करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांकडून एक दोन तीन चार, जिल्हा परिषद शाळा छान !चला शाळा झाली सुरू ,नका नका घरी आता राहू! छान छान छान किती छान, नव्या पिढीचा मी अभिमान! सब पढे सब बढे, अज्ञान से हम लढ़े! चला शिकूया पुढे जाऊया जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेऊ या! असे अनेक घोषवाक्य देण्यात आले.[ads id="ads2"]

      दिनांक 15 जून 2023 रोजी शेवाळी येथील जिल्हा परिषद डिजिटल एकलव्य शाळा चौक शाळेत "शाळा पूर्वतयारी" शुभारंभ व प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते .सदर कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.चंदू माळचे, उपाध्यक्ष, उपसरपंच केतन साळुंके व सदस्य तसेच इयत्ता पहिली चे विद्यार्थी व त्यांचे पालक, मुख्याध्यापिका क्रांती साळुंके शिक्षक गोकुळ साळुंखे व अंगणवाडी सेविका योगिता साळुंखे, मदतनीस आदी उपस्थित होते.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️