धक्कादायक म्हणजे दिनांक ९ जून गुरुवारी अचानक आलेल्या वादळामुळे घरावरील पत्रे, अँगल, पाईप व झोक्यासहीत 4 महिन्याची चिमुरडी उडून गंभीर जखमी झाल्याची घटना रावेर शहरातील ईदगाह रोडवरील मदिना कॉलनीत घडली असून जखमी चिमुरडीवर बऱ्हाणपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर तिचे आई, वडील किरकोळ जखमी झाले आहे.[ads id="ads2"]
सविस्तर वृत्त असे की, रावेर शहारातील मदिना कॉलनीतील हरीस खान रईस खान यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील घराचे पत्रे, अँगल व पाईपासह चक्रीवादळामुळे उडाले होते. घराच्या पाईपाला दोरीचा झोका बांधून त्यांची अनबिया हरीश खान (वय ४ महिने) ही झोपली होती. मात्र पत्र्यासहित पाईप, झोका व त्यातील बालीका वादळामुळे उडून घराच्या मागील बाजूस सुमारे शंभर ते दीडशे फूट अंतरावर पत्र्यासह खाली पडला.
• हेही वाचा: अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना 401 कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर : जिल्हानिहाय यादी पहा
• हेही वाचा : रावेर तालुक्यातील "या" ठिकाणी पिस्टल व जिवंत काडतूसांसह गुन्हेगाराला बेड्या
• हेही वाचा: रावेर शहरामध्ये एकाच वेळी पाच ठिकाणी घरफोड्या ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
पाऊस व वादळ शांत झाल्यावर या मुलीची शोधाशोध करण्यात आली. सदर बालिका पत्र्याखाली गंभीर अवस्थेत मिळून आली. तिला तात्काळ बऱ्हाणपूर येथील ऑल इज वेल रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू आहे. दरम्यान तिचे वडील हरीस खान रईस खान (वय ३०) व त्यांची पत्नी आशयमाबी (वय २८) हे किरकोळ जखमी झाले आहेत.