रावेर शहरामध्ये एकाच वेळी पाच ठिकाणी घरफोड्या ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

 


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर शहरात (Raver City)  मंगळवारी दिनांक 6 जून रोजी  रात्री एकाच भागात पाच ठिकाणी बंद असलेले  चोरट्यांकडून घरे फोडण्यात आल्याने नागरीकांमध्ये प्रचंड घबराह ट पसरली आहे. रावेर शहरातील(Raver City)  झालेल्या पाचही घरफोड्यांमध्ये सुमारे 17 हजारांचा ऐवज लांबवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. फैजपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक(DYSP) डॉ. कुणाल सोनवणे, रावेर पोलीस स्टेशनचे  पोलीस निरीक्षक(Raver Police Station PI)  कैलास नागरे यांनी भेट देवून पाहणी केली.[ads id="ads1"]

चोरट्यांकडून  घर फोडीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण 

रावेर शहरातील (Raver City) सावदा रोडवरील(Savada Road)  अष्टविनायक नगर(Ashtvinayak Nagar)  येथे दिनांक 6 जून 2023 रोज मंगळवारी रात्री पाच ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या. बंद घराचे कुलूप तोडून या घरफोड्या करण्यात आल्या.[ads id="ads2"]

   त्यातील एका घरातून 10 हजार रुपये रोख व सात हजाराचे चांदीचे लहान मुलांचे दागिणे असा 17 हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला. एकाच भागात झालेल्या पाच घरफोड्यांमुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रावेर पोलिसांनी(Raver Police)  रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी जोर धरत आहे. 

• हेही वाचा: अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना 401 कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर : जिल्हानिहाय यादी पहा

• हेही वाचा : रावेर तालुक्यातील "या" ठिकाणी पिस्टल व जिवंत काडतूसांसह गुन्हेगाराला बेड्या

फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी(DYSP)  डॉ. कुणाल सोनवणे, रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक(Raver Police Station PI)  कैलास नागरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. रमेश चौधरी यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️