पाल जवळील शेरी नाक्यावर रोखली अवैध गुरांची वाहतूक
रावेर पोलिस स्टेशन चे (Raver Police Station) पोलीस कॉन्स्टेबल उमेश रमेश नरवाडे यांच्या तक्रारीनुसार, पाल गावाजवळील शेरी नाक्याजवळ (Sheri Naka,Pal) आयशर (MH 18 BG 6877) मधून अवैधरीत्या म्हशींची डॉक्टरांच्या प्रमाणपत्राविना व दाटीवाटीने व निदर्यतेने वाहतूक होत असल्याचे दिसून आल्यानंतर रावेर पोलिसांनी (Raver Police Station) आयशर ताब्यात घेत रावेर पोलीस ठाण्यात (Raver Police Station) आणला आहे. [ads id="ads2"]
वाहनामधील सहा लाखांच्या 18 म्हशींची सुटका करून त्यांची गो शाळेत रवानगी करण्यात आली तर पाच लाख रुपयांचे आयशर वाहन जप्त करण्यात आले. या प्रकरणी संशयित रफिक खान मेहराज खान (वय 29, गुलशन नगर, चांदणी चौकाजवळ, खरगोन, मध्यप्रदेश), साकीर सलीम खान (वय 28), काला अकलीम खान (वय 33, दोन्ही रा. खसखसवाडी, खरगोन, मध्यप्रदेश) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर संशयिताना अटक करण्यात आली. सदर घटनेचा पुढील रावेर पोलिस स्टेशन चे (Raver Police Station) पोलिस नाईक किशोर सपकाळे हे करीत आहेत.