गुरांची अवैध वाहतूक करणारी आयसर रोखली ; 18 म्हशींची सुटका ; रावेर पोलिसांची कारवाई

 

गुरांची अवैध वाहतूक करणारी आयसर रोखली ; 18 म्हशींची सुटका ; रावेर पोलिसांची कारवाई

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा)  : रावेर पोलिसांनी पालजवळील शेरी नाक्यावर (Sheri Naka,Pal) आयशर वाहनातून अवैधरीत्या गुरांची वाहतूक होताना कारवाई करीत 18 म्हशींची सुटका केली तर तीन जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली. सदरची ही कारवाई सकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईने जनावरांची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्यांच्या गोटात एकाच खळबळ उडाली आहे.[ads id="ads1"]

पाल जवळील शेरी नाक्यावर रोखली अवैध गुरांची वाहतूक

रावेर पोलिस स्टेशन चे (Raver Police Station) पोलीस कॉन्स्टेबल उमेश रमेश नरवाडे यांच्या तक्रारीनुसार, पाल गावाजवळील शेरी नाक्याजवळ (Sheri Naka,Pal) आयशर (MH 18 BG 6877) मधून अवैधरीत्या म्हशींची डॉक्टरांच्या प्रमाणपत्राविना व दाटीवाटीने व निदर्यतेने वाहतूक होत असल्याचे दिसून आल्यानंतर रावेर पोलिसांनी (Raver Police Station)  आयशर ताब्यात घेत रावेर पोलीस ठाण्यात (Raver Police Station) आणला आहे. [ads id="ads2"]

  वाहनामधील सहा लाखांच्या 18 म्हशींची सुटका करून त्यांची गो शाळेत रवानगी करण्यात आली तर पाच लाख रुपयांचे आयशर वाहन जप्त करण्यात आले. या प्रकरणी संशयित रफिक खान मेहराज खान (वय 29, गुलशन नगर, चांदणी चौकाजवळ, खरगोन, मध्यप्रदेश), साकीर सलीम खान (वय 28), काला अकलीम खान (वय 33, दोन्ही रा. खसखसवाडी, खरगोन, मध्यप्रदेश) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर संशयिताना अटक करण्यात आली. सदर घटनेचा पुढील रावेर पोलिस स्टेशन चे (Raver Police Station) पोलिस नाईक किशोर सपकाळे हे करीत आहेत.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️