मुक्ताईनगर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : लोककवी प्रतापसिंग दादा बोदडे जयंती महोत्सव दिन दिनांक २२/६/२०२३ रोजी मुक्ताईनगर शहरातील परिवर्तन चौकात साजरा करण्यात येणार आहे. जयंती महोत्सव दिनामध्ये प्रतापसिंग दादा यांना अभिवादन करून महामानवांच्या विचारधारेचे प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे हे आयोजन करण्यात आले आहे. [ads id="ads1"]
या कार्यक्रमांमध्ये मुंबई येथील सिनेपार्श्वगायक आनंद शिंदे,नागपूर येथील कव्वाली चे बादशाह असणारे प्रकाशनाथ पाटणकर,भास्कर सकपाळ,प्रतापसिंग दादांचे प्रथम शिष्य,नागसेनदादा सावदेकर, प्रतापसिंग दादा यांचे शिष्य स्वर सम्राट कुणाल बोदडे,प्राध्यापक डॉ. किशोर वाघ,प्रताप सिंग दादांचे शिष्य मेघानंद जाधव,औरंगाबाद, संतोष गायकवाड पुणे,अजय देहाडे औरंगाबाद, सपना खरात,अकोला यांच्यासह आदि गायक प्रामुख्याने उपस्थित राहून दादांना अभिवादन करून गीत गायन करणार आहे. [ads id="ads2"]
त्याचप्रमाणे महाराष्ट्रातून फार मोठ्या संख्येने इतर गायकी उपस्थित राहतील.कार्यक्रमाची रूपरेषा फार सुंदर आणि भव्य स्वरूपाचे आहे तसेच कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी अनेक मान्यवर सुद्धा उपस्थित राहते या कार्यक्रमांमध्ये समाज बांधव व परिसरातील बांधवांनी उपस्थित रहावे. अशी विनंती आयोजक प्रतापसिंग दादा बोदडे उत्सव समिती यांनी केली आहे.