रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सादर केला जनसंवाद यात्रेचा कार्य अहवाल

मुक्ताईनगर ( सुवर्ण दिप वृत्तसेवा)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी 15 ऑगस्ट 2022 स्वातंत्र्यदिन ते 26 नोव्हेंबर 2022 संविधानदिन या कालावधी दरम्यान मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनसंवाद यात्रा काढली होती या यात्रेदरम्यान रोहिणी खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मुक्ताईनगर मतदारसंघातील 182 गाव-वस्त्या, खेड्यां- पाड्यांवर जाऊन तेथील स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन तेथील नागरिकांचे ताबोडतोब सुटणारे प्रश्न संबंधित विभाग, अधिकारी यांच्या सोबत दूरध्वनी वरून संपर्क साधून तिथेच जागच्या जागी मार्गी लावले होते व काही प्रश्न पक्ष कार्यालय आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून सोडविले होते सार्वजनिक हिताच्या मागण्या आ.एकनाथराव खडसे , जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील यांच्या माध्यमातून सोडविण्यासाठी प्रयत्नरत आहेत.[ads id="ads1"]
रोहिणी खडसे यांनी यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्यता नोंदणी अभियान राबवून सदस्य नोंदणी करून घेऊन बुथ रचना, शाखा समित्या स्थापन केल्या होत्या.
त्याचबरोबर रोहिणी खडसे यांनी जनसंवाद यात्रे दरम्यान महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेली विकास कामे, कल्याणकारी योजना यांचा प्रसार करून सर्व योजना शेवटच्या घटका पर्यंतपोहचवण्याचा प्रयत्न केला होता यातून मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन मजबुत होण्यासाठी मदत झाली होती त्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणूक, बाजार समिती निवडणूक यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घवघवीत यश प्राप्त झाले होते, मतदारसंघातील मतदारां सोबत प्रत्यक्ष संपर्क साधण्यासाठी आणि पक्ष संघटन बांधणी साठी रोहिणी खडसे यांनी काढलेली जनसंवाद यात्रा फलदायी ठरली.[ads id="ads2"]
यात्रेत आलेले अनुभव, यात्रेचा उद्देश, यात्रेला मिळालेली सफलता या सर्वांची माहिती असलेला संक्षिप्त अहवाल अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांची मुंबई येथे भेट घेऊन त्यांना सुपूर्द केला .
आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वच स्तरावर मजबूत करण्यासाठी व सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहणार असल्याच रोहिणी खडसे यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सांगितले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी मुक्ताईनगर मतदारसंघातील बुथ कमिटया शंभर टक्के पूर्ण करून नियमित बुथ कमिटी सदस्यांची मिटिंग घेण्याविषयी सूचना केल्या .
तसेच एक तास राष्ट्रवादीसाठी हा उपक्रम पदाधिकाऱ्यांनी राबवावा त्यासाठी आणि पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी रोहिणी खडसे यांना योग्य ते मार्गदर्शन केले.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️