आज दहावीचा निकाल ; एका क्लिक वर घरबसल्या पाहता येणार निकाल

 


(सुविधा ऑनलाईन रावेर) Maharashtra SSC Result 2023 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं अत्यंत महत्त्वाची माहिती देत दहावी बोर्डाच्या परीक्षांच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. गुरुवारी म्हणजेच 2 जून 2023 रोजी दहावीचा निकाल दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार असल्याची माहिती शिक्षण मंडळानं दिली आहे. [ads id="ads1"] 

निकाल ऑनलाईन जाहीर होण्यापूर्वी सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद होईल. राज्यात 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये 8,44,116 मुलं आणि 7,33,067 मुलींचा समावेश आहे. तेव्हा या सर्वच विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालक आणि शिक्षकांनाही निकालाबाबत उत्सुकता आहे. [ads id="ads2"] 

सहसा दहावीचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो. पण, यंदाच्या वर्षी मात्र बारावीच्या मागोमाग दहावीचेही निकाल लागलीच जाहीर केले जाणार आहेत. 2 ते 25 मार्च 2023 या कालावधीत घेण्यात आलेल्या या परीक्षेचे निकाल लागल्यानंतर आता लाखो विद्यार्थी त्यांच्या शालेय आयुष्याच्या विश्वाहून बाहेर पडून महाविद्यालयीन जीवनाची नवी सुरुवात करणार आहेत. तत्पूर्वी निकाल नेमका कसा आणि कुठे पाहाल हे जाणून घ्या... 

दहावीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी mahresult.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. 

त्यानंतर होमपेजवर असणाऱ्या  Maharashtra SSC result च्या लिंकवर क्लिक करावं.

 खालील लिंक वरून सुद्धा पाहता येणार निकाल

sscresult.mkcl.org

ssc.mahresults.org.in

https://hsc.mahresults.org.in


जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️