जळगाव येथील सैनिकी मुला-मुलींचे वसतीगृहातील विविध पदांसाठी भरती : अर्ज करण्याचे आवाहन

 जळगाव जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या सैनिकी मुला / मुलींचे वसतीगृह येथे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात रोजंदारी पध्दतीने वसतिगृह अधिक्षक 1 पद (पुरुष), स्वयंपाकी-3 पदे (स्त्री), सफाई कर्मचारी 1 पद (स्त्री) ही पदे माजी सैनिक संवर्गातून भरावयाची आहेत.[ads id="ads2"]

तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह 25 जून, 2023 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव येथे सादर करावेत. निवड करण्याचे किंवा एखादा अर्ज कोणतेही कारण न देता निकाली काढण्याचे सर्व अधिकार निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांनी राखून ठेवले आहेत. अधिक माहितीसाठी 0257/2241414 या दुरध्वीवर संपर्क साधावा. असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रविंद्र भारदे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.


जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️