छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय निसर्ग मित्र पुरस्कारासाठी भालचंद्र कुवर यांची निवड



साक्री (सुवर्ण दिप वृत्तसेवा):- वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती,( धुळे )तर्फे दिला जाणारा छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय  निसर्ग मित्र पुरस्कारासाठी वासखेडी  येथील वृक्षसंवर्धन आणि  पर्यावरण प्रेमी व सेवानिवृत्त मुख्याध्यापक  भालचंद्र दामोदर कुवर  यांची छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.[ads id="ads1"]

   या बाबत निसर्ग मित्र समितीचे संस्थापक प्रेमकुमार अहिरे, जिल्हाध्यक्ष डी.बी.पाटील यांचे पत्र प्राप्त झाले आहे.  श्री भालचंद्र कुवर यांनी आपल्या मित्रांना सोबत घेऊन वासखेडी येथे ग्रामविकास मंच स्थापित केला या माध्यमातून गावातील लोकांना व नोकरीनिमित्त बाहेरगावी असणाऱ्या व्यक्तींना आवाहन करून कुटुंबातील दिवंगत व्यक्तींच्या स्मरणार्थ, वाढदिवसी अशा विविध निमित्ताने वृक्षदाते उपलब्ध करून आजपर्यंत गावाच्या स्मशानभूमीत व रस्त्याच्या दुतर्फा 350 च्या वर वृक्ष लागवड केली. [ads id="ads2"]

  तसेच सामाजिक, शैक्षणिक, कृषी व पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती तर्फे दि.5 जुन जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने व निसर्ग मित्र समितीचा वर्धापन दिनी आपली छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कारासाठी निवड करण्यात येत आहे. दि.18 जून रविवार रोजी देवपूर धुळे या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. या पुरस्कारा बद्दल भालचंद्र  यांचे ग्राम विकास मंच चे सदस्य व गावकरी तसेच  सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️