सर्पदंशाने 16 वर्षीय मुलाचा मृत्यू ; जळगाव जिल्ह्यातील दुःखद घटना



जळगाव (सुवर्णदिप वृत्तसेवा) : चोपडा  तालुक्यातील (Chopda Taluka) आदिवासी भागातील मुळ्यावतार गावानजीक असणाऱ्या पिंपरपाडा (Pimparpada Taluka Chopda Dist Jalgaon)  या पाड्यातील आदिवासी मुलाचा दिनांक १८ जून  रोजी सकाळी ६ वाजे च्या दरम्यान सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. [ads id="ads1"]

 याबाबत सविस्तर असे की, चोपडा तालुक्यातील (Chopada Taluka) मुळ्यावतार गावाजवळ असणाऱ्या पिंपरपाडा पाडा येथील इयत्ता ८ वी मध्ये शिकणारा लखीराम सिताराम बारेला (वय-१६ वर्ष) हा सकाळी झोपेतून उठून लघुशंकेसाठी घराबाहेर आला असता कोब्रा जातीच्या विषारी सापाने त्याला दंश केला. त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात (Chopda Civil Hospital) आणण्यात आले. [ads id="ads2"]

 इथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले, पोलिस स्टेशनला (Police Station) तशी नोंद करण्यात येऊन शवविच्छेदन डॉ. सागर पाटील यांनी केले. यावेळी डॉ. चंद्रकांत बारेला उपस्थित होते, मृत लखीराम हा येथील हिंगणवाडे आश्रमशाळेत (Hinganwade Aashram School)  इयत्ता आठवीत शिकत होता. त्यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण गावावर दुःखांचा डोंगर कोसळला.

हेही वाचा : रावेर शहरातील 24 वर्षीय युवकाने गळफास घेत संपविली जीवनयात्रा

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️