मात्र हे उपकरण कधी जीवावर बेततील याचा कोणालाही पत्ता नसतो. अशीच एक दुर्दैवी घटना जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातून (Chopda Taluka Jalgaon District)समोर आली आहे. दोन मुलींच्या पाठीवर जन्मलेल्या पाच वर्षीय चिमुकल्या बाळाचा कुलरचा शॉक (कुलर Shock) लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक ८ जून गुरुवारी सायंकाळी बिडगाव (Bidgaon) येथे घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.सोहेल जावेद तडवी वय पाच वर्षे असे मृत झालेल्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे.[ads id="ads1"]
जावेद इस्माईल तडवी यांना दोन मुलींच्या पाठीवर मुलगा झाला होता. एकुलता एक मुलगा सोहेल,दोन मुली पत्नी, आई वडिलांसह त्यांचे कुटुंब राहते. गुरूवारी सायंकाळी सोहेल हा जवळील दोन लहान मुलांसोबत खेळत होता. खेळत खेळत ते तिन्ही मुले जवळीलच मुजात महारू तडवी यांच्या घरात गेले तेथे पत्री कुलर लावलेले होते. त्यात विज प्रवाह ऊतरला होता. त्या कुलरला सोहेलचा धक्का लागला व तो जोरात फेकला गेला. जवळील मुलांनी आरडा-ओरड करताच. गर्दी जमा झाली व त्याला आधी धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात व तेथून रुग्णवाहिकेतून चोपडा येथे खासगी हास्पीटलला नेण्यात आले.तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित झाल्याचे केले.[ads id="ads2"]
Chopda Civil Hospital चोपडा उपजिल्हा रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देताच आई वडीलांनी हंबरडा फोडत मोठा आक्रोश केला. रात्री उशिरा त्यांचेवर बिडगाव (Bidgaon Taluka Chopda)अंत्यसंस्कार करण्यात आले. क्रुर काळाने एकलुता एक मुलगा हिरावून नेल्याने आई वडील व नातेवाईकांचा आक्रोश मन सुन्न करणारा होता. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत अडावद पोलिस ठाण्यात (Adawad Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
• हेही वाचा : डोळ्यामध्ये तिखट टाकून बचत गट कर्मचाऱ्यापासून 67 हजार लुटले : रावेर तालुक्यात "या" ठिकाणी घडली घटना
• हेही वाचा : अचानक आलेल्या वादळामुळे 4 महिन्याची चिमुरडी झोक्यासहीत उडाली : रावेर शहरातील दुर्घटना
• हेही वाचा: अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना 401 कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर : जिल्हानिहाय यादी पहा
• हेही वाचा : रावेर तालुक्यातील "या" ठिकाणी पिस्टल व जिवंत काडतूसांसह गुन्हेगाराला बेड्या
• हेही वाचा: रावेर शहरामध्ये एकाच वेळी पाच ठिकाणी घरफोड्या ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण