तरूणांनी सैन्यात येऊन भारत देशाची सेवा करावी - राजपाल सिंग
[ आय.टी.बी.पी.इन्स्पेक्टर ]
चाळीसगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा)
चाळीसगाव - तालुक्यातील वडाळा वडाळी येथे दिनांक २८ जून २०२३ रोजी सैन्य दलातील आय.टी.बी.पी.विभागातून शहीद गणेश अहिराव यांना मानवंदना देण्यात आली २५ जून २०२३ रोजी उत्तराखंड मधिल गौरीकुंड येथे आलेल्या महाप्रलयात अडकलेल्या नागरिकांच्या बचाव कार्य करताना हेलिकॉप्टर दुर्घटनेत एन डी आर एफ जवान शहीद गणेश अहिरराव हे देश सेवा करताना शहीद झाले होते त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी ४४ बटालियन आय टी बी पी बेळगाव कर्नाटक येथून कमांडेट मुकेश कुमार धसमाना व अर्गुडन दिनेशचंद वडोला यांच्या आदेशाने इन्स्पेक्टर राजपाल सिंग, इन्स्पेक्टर संतसिंग, कॉन्स्टेबल मुकेश, कॉन्स्टेबल आदित्य, यांची टीम वडाळा वडाळी या ठिकाणी दाखल होऊन या टीम तर्फे शहीद गणेश अहिरराव यांना मानवंदना देऊन श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच त्यांच्या कुटुंबाची विचारपूस करून त्यांना एक भेटवस्तू देण्यात आली त्यावेळी गावातील उपस्थित सर्व ग्रामस्थांना आय.टी.बी.पी.इन्स्पेक्टर राजपाल सिंग यांनी मोलाचे मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे तरुणांना सैन्यात येण्याचे आव्हान केले त्यावेळी उपस्थीत ग्रामस्थ भावनिक झाले होते तर गावातील दिलीप जैन सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शहीद गणेश अहिरराव यांच्या कुटुंबातील आई-वडिलांची जी आज परिस्थिती आहे ती वरिष्ठांपर्यंत संदेश पोहोचवण्याची मागणी केली त्यावेळी सैन्य दलातील किशोर शेलार,शहीद गणेश अहिरराव,यांचे वडील हनुमंत अहिरराव, गावातील पोलीस पाटील निलेश अहिरराव, माजी सरपंच सुनंदा अशोक आमले, दिलीप जैन सर, किशोर शेवरे,रवींद्र सोनवणे, अशोक अहिराव,अविनाश पाटील, मनीष पाटील,यांच्यासह साने गुरुजी माध्यमिक विद्यालय येथील सर्व शिक्षक स्टॉप व विद्यार्थी व गावातील ग्रामस्थ तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.