औरंगाबाद (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : निळे प्रतिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. येत्या २९ जून २०२३ रोजी मौलाना आझाद संशोधन केंद्र या सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तींना हे पुरस्कार वितरीत केले जाणार आहेत.या पुरस्कार वितरण सोहळयाचे उद्घाटन संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अॅड. धनंजय बोरडे यांच्या हस्ते होणार आहे. [ads id="ads1"]
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी बँकेचे अध्यक्ष पी.बी. अंभोरे हे भूषविणार आहेत. दैनिक सकाळ’ चे निवासी संपादक हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहतील. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक, समीक्षक तथा जेष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रा.डॉ. ऋषिकेश कांबळे, प्रा. भिक्खुनी धम्मदर्शना महाथेरी, मनपाचे अप्पर आयुक्त सौरभ जोशी, औरंगाबाद जिल्हा बँकेचे संचालक डॉ. सतीश गायकवाड, अधिक्षक अभियंता एस.एस. भगत, बौद्ध साहित्याचे अभ्यासक व लेखक धनराज गोंडाणे, [ads id="ads2"]निवृत्त न्यायाधीश शंकरराव दाभाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात, प्रज्ञा गोपनारायण यांची प्रमुख उपस्थिती राहिल. तसेच निवृत्त आयएएस अधिकारी शिवानंद टाकसाळे, घाटी हॉस्पिटलचे सेवानिवृत्त अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत थोरात, भन्ते धम्मबोधी, जनार्दनराव म्हस्के, जेष्ठ साहित्यिक धोंडोपंत मानवतकर, प्रा. भारत सिरसाट, जेष्ठ नेते रतनकुमार पंडागळे, एन.डी. जीवने, आंबादास रगडे, श्रावणदादा गायकवाड, उपअभियंता बी.एस. कांबळे, जेष्ठ पत्रकार माणिकराव साळवे, पोलीस निरिक्षक गौतम पातारे, ज्येष्ठ नेते मुकूंददादा सोनवणे यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास सर्व निमंत्रित तसेच हितचिंतकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा संपादक रतनकुमार साळवे यांनी केले आहे.