डोळ्यामध्ये तिखट टाकून बचत गट कर्मचाऱ्यापासून 67 हजार लुटले : रावेर तालुक्यात "या" ठिकाणी घडली घटना

 


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा)  : बचत गट कर्मचारी वसुलीची रक्कम बँकेमध्ये पैसे जमा करण्यासाठी जात असताना मोटर सायकल वरून आलेल्या दोन जणांनी रस्ता अडवत व डोळ्यात तिखट टाकून 67 हजार 143 रुपयांची रोकड लुटल्याची घटना रावेर तालुक्यातील अटवाडा-मोरगाव (Atwada Morgaon Road) रस्त्यावर दिनांक ८ जून गुरुवार रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. भर दिवसा झालेल्या लुटीनंतर संपूर्ण रावेर तालुक्यात (Raver Taluka) मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रावेर पोलिस स्टेशनमध्ये (Raver Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला.[ads id="ads1"]

 दिवसा ढवळ्या रोकड लुटल्याने रावेर तालुक्यात घबराहटीचे वातावरण

 बचत गट बँक कर्मचारी नामे आकाश अनिल पाटील (रा. जुना सावदा रोड, रावेर ता.रावेर जि.जळगाव) हे गुरुवार, दिनांक 8 जून रोजी रावेर तालुक्यातील अटवाडे (Atwade Taluka Raver Dist Jalgaon) येथून बचत गटाचे वसुलीचे पैसे घेऊन मोरगाव मार्गे रावेरच्या दिशेने येत होते. मोरगावजवळील रस्त्यात असलेल्या पुलाजवळ बँक कर्मचारी आकाश पाटील यांना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी अडवले व त्याच्या डोळ्यात मिरचीची पावडर टाकून त्याच्या जवळील 67 हजार 143 रुपयांची रोकड लुटली. [ads id="ads2"]

  या घटनेनंतर घाबरलेल्या आकाश पाटील यांनी रावेर पोलीस ठाणे (Raver Police Station) गाठत तक्रार दिल्यानंतर अज्ञात दोघांविरोधात रावेर पोलिस स्टेशनमध्ये (Raver Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) कुणाल सोनवणे, रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (PI) कैलास नागरे, पोलीस उपनिरीक्षक मनोहर जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली असून सदर घटनेचा तपास फौजदार सचिन नवले हे करीत आहे.

• हेही वाचा : अचानक आलेल्या वादळामुळे  4 महिन्याची चिमुरडी झोक्यासहीत उडाली : रावेर शहरातील दुर्घटना

• हेही वाचा: अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना 401 कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर : जिल्हानिहाय यादी पहा

• हेही वाचा : रावेर तालुक्यातील "या" ठिकाणी पिस्टल व जिवंत काडतूसांसह गुन्हेगाराला बेड्या

• हेही वाचा:  रावेर शहरामध्ये एकाच वेळी पाच ठिकाणी घरफोड्या ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️