रावेर तालुक्यातील "या" ठिकाणी पिस्टल व जिवंत काडतूसांसह गुन्हेगाराला बेड्या


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर-बर्‍हाणपूर रस्त्यावरील(Raver-Burhanpur Road) अटवाडा फाट्याजवळ(Atwada Fata) तीन जण आपापसात मारामारी करीत होते.त्याठिकाणी रावेर पोलिसांनी(Raver Police) धाव घेत एका संशयीताला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे गावठी कट्टा व तीन जिवंत काडतूस सापडल्याने संशयितास अटक तात्काळ करण्यात आली.[ads id="ads1"]

   ही कारवाई शनिवारी दिनांक ३ जून २०२३ रोजी सायंकाळी ६.१५ मिनिटांनी करण्यात आली. मुजाहिद खान इब्राहीन खान (वय 27, मदिना मशीद, बर्‍हाणपूर, मध्यप्रदेश) असे अटक झालेल्या आरोपीचे नाव असून त्याच्यासोबत असलेले दोघे संशयित पसार झाले आहेत.

गोपनीय माहितीवरून कारवाई

रावेर पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक(Raver Police Station PI) कैलास नागरे यांना रावेर-बर्‍हाणपूर(Raver- Burhanpur Road) रस्त्यावरील अटवाडा फाट्याजवळ (Atwada Fata)हाणामारी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले, कर्मचारी सचिन घुगे, विखार शेख, प्रदीप पाटील, सुकेश तडवी यांना पाठवण्यात आले.[ads id="ads2"]

   यावेळी हाणामारी होत असताना पोलीस येताच दोन संशयित केळी बागेमध्ये पसार झाले तर मुजाहिद खान याला पकडण्यात आरोपींना यश आले. आरोपीच्या कमरेला तीन जिवंत काडतूस लोड केलेले गावठी बनावटीचे 28 हजार रुपये किंमतीचे पिस्तूल आढळल्याने ते जप्त करण्यात आले.

संशयितावर रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

हाणामारीत मुजाहिद हा जखमी झाल्याने त्याच्यावर रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात(Raver Rural Hospital) उपचार सुरू आहेत.

हेही वाचा: उद्योजक बनायचं आहे का ? मग आजच अर्ज करा.....महाराष्ट्र शासनातर्फे मिळणार व्यवसायासाठी तब्बल "इतके" रुपये

हेही वाचा: दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी : भारतीय डाक विभागात 12828 जागांसाठी भरती

 संशयीत सराईत गुन्हेगार असून विविध पोलिस ठाण्यात त्याच्या विरूद्ध अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती रावेर चे पोलीस निरीक्षक (Raver Police Station PI) कैलास नागरे यांनी दिली. या प्रकरणी पोलीस कर्मचारी प्रमोद पाटील यांच्या फिर्यादीनुसार आरोपी विरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोहर जाधव हे करीत आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️