रावेर शहरातील 24 वर्षीय युवकाने गळफास घेत संपविली जीवनयात्रा

रावेर  (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर शहरातील संत रोहिदास नगरातील(Sant Rohidas Nagar,Raver)  24 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना दिनांक १६ जून शुक्रवार रोजी घडली. उमेश श्रावण सूर्यवंशी वय- 24 राहणार - संत रोहिदास नगर, रावेर असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. या प्रकरणी रावेर पोलिसात (Raver Police Station)अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.[ads id="ads2"]

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

सविस्तर वृत्त असे की, उमेश सूर्यवंशी या तरुणाने घरी कुणीही नसताना गळफास घेतला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर रावेर पोलिसांना (Raver Police Station) माहिती कळवल्यानंतर त्यांनी भेट देत पंचनामा केला. या प्रकरणी रावेर पोलिस स्टेशन (Raver Police Station) मध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सदर घटनेचा तपास पोलीस नाईक अतुल तडवी हे करीत आहेत.


जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️