रावेर तालुक्यातील चिनावल येथील 46 वर्षीय इसमाची मुक्ताईनगर मध्ये दगडाने ठेचून हत्या ; परिसरात खळबळ


मुक्ताईनगर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) मुक्ताईनगर (Muktainagar) येथे बोदवड रस्त्यावरील(Bodwad Road)  सातोड शिवारात (Satod Shivar) रस्त्याच्या कडेला एका अनोळखी इसमाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सकाळी आढळून आला.यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून मयत हा चिनावल ता. रावेर (Chinawal Taluka Raver) येथील असल्याचे तपासाअंती समोर आले. मात्र, हत्येचे कारण गुलदस्त्यात असल्याने पोलीसांनी (Police) तपासाची चक्रे फिरवली असून मारेकरी लवकरच गजाआड होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.[ads id="ads1"]

मुक्ताईनगर ते बोदवड (Muktainagar - Bodwad) रस्त्यावरील संत मुक्ताबाई मंदीर लगतच्या सातोड शिवारातील रस्त्यालगत एका इसमाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याची माहिती मुक्ताईनगर पोलीसांना(Muktainagar Police) दिनांक 6 जून रोजी सकाळी मिळाली. त्यानुसार पोलीसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली तसेच या घटनेची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक(SP), पोलीस उपविभागीय अधिकारी(DYSP) यांना देण्यात आल्याने त्यानीही घटनास्थळी भेट देवून पाहणी केली असता मयताची हत्या दगडाने व टणक हत्याराने केल्याचे दिसुन आले. [ads id="ads2"]

  यामध्ये मयताचा चेहरा छिन्नविछीन्न अवस्थेत असल्याने पोलीसांनी सुरुवातीला तपासाची चक्रे फिरवुन मयताची ओळख पटवली. यामध्ये मयत हा रविंद्र मधूकर पाटील वय -४६, रा. चिनावल ता. रावेर येथील असल्याचे समोर आले. मात्र, हि घटना कशी घडली ?, मयताची हत्या कुणी व का? केली याबाबत रात्री उशिरा पर्यंत माहिती काढण्याचे काम सुरू होते .तर या घटनेप्रकरणी मयताचा भाऊ योगेश मधुकर पाटील वय -४० रा. चिनावल यांनी फिर्याद दिल्यावरून पोलीस ठाण्यात भाग - ५ भादंवि कलम ३०२,२०१ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असुन घटनेचा सपोनि संदिप दुनगुहू तपास करीत आहेत.

अशी पटली ओळख

रावेर तालुक्यातील चिनावल (Chinawal Taluka Raver)  येथील नम्रता पाटील यांनी आपले पती रविंद्र पाटील हे गेल्यादोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार सावदा पोलिस स्टेशनला (Savda Police Station) दाखल केली. दरम्यान मुक्ताईनगर (Muktainagar)  येथे तरुणाचा मृतदेह आढळून आला. मिसींग मधील तरुणाचे वर्णन मयत तरुणाच्या वर्णनासोबत जुळून आले. मयत रविंद्र पाटील यांच्या हातावर त्यांची मुलगी रोशनी हिचे नाव गोंदलेले होते. गोंदलेल्या शब्दांवरुन ओळख पटण्यात मदत झाली.

रवींद्र पाटील हे पतपेढीत नोकरीला होते. 4 मे रोजी त्यांचे पत्नीसोबत बोलणे झाले होते. रविंद्र पाटील यांच्यामृतदेहापासून काही अंतरावर त्यांची दुचाकी देखील पोलिसांना आढळून आली आहे. कुणीतरी जवळच्या मित्राने अथवा परिचीताने हा खून केला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचायावल तहसीलदारपदाचा चार्ज घेण्याआधीच अवैध गौण खनिज वाहतूकदारांना नवनियुक्त तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांचा दणका

हेही वाचारावेर तालुक्यातील "या" ठिकाणी पिस्टल व जिवंत काडतूसांसह गुन्हेगाराला बेड्या

हेही वाचा :  रावेर तालुक्यातील "या" गावातील ३० वर्षीय विवाहिता बेपत्ता : रावेर पोलीसांत हरवल्याची नोंद

सकाळी रविंद्र पाटील याचा मृतदेहा बाबत माहिती मिळताच मुक्ताईनगर व गुन्हे शाखेच्या पोलीसांनी वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरवली असुन मारेकरी आरोपींना लवकरच गजाआड करण्यात येईल अशी माहिती समोर येत आहे.


घटनास्थळी यांनी दिली भेट

जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नजन पाटील प्रभारी आयपीएस अधिकारी सतीश कुलकर्णी मुक्ताईनगरचे डीवायएसपी राजकुमार शिंदे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ सपोनी संदीप दूनगहू पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद श्रीनाथ पोलीस नाईक संतोष नागरे तसेच या ठिकाणी फॉरेन्सिक लॅबचे पथक सुद्धा दाखल झाले आहे धर्मेंद्र ठाकूर रवींद्र धनगर विनोद सोनवणे रवींद्र मेढे तसेच मुक्ताईनगर डीएसपी कार्यालयाचे पोलीस नाईक कांतीलाल केदारे पोलीस नाईक देवसिंग तायडे आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️