जांबूत या गावात दूषित पाण्याचा पुरवठा ; प्रशासनाचे दुर्लक्ष

 


शुभम वाकचौरे (पुणे जिल्हा प्रतिनिधी) : ता- शिरूर,जांबूत येथील गावामध्ये  मागील दोन चार दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा सुरु आहे.या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला किंवा जनावरांच्या आरोग्याला धोका होऊ. जरी नागरिकांनी या पाण्याचा पिण्यासाठी वापर केला नाही तरी जनावरांना हेच पाणी द्यावे लागेल या दूषित पाण्यामुळे जनावरांचा मृत्यू देखील होऊ शकतो व जरी नागरिकांनी या पाण्याचा पिण्यासाठी वापर केला नाही तरी इतर वापरांसाठी या दूषित पाण्याचा उपयोग करावा लागेल या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे  आरोग्य धोक्यात येऊ शकते .[ads id="ads1"]  

 या गंभीर समस्येकडे जांबूत ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येते.जांबूत ग्रामपंचायत मधील सरपंच तथा सदस्यगण यांनी या दूषित पाणी पुरवठ्याकडे लक्ष देऊन या दूषित पाण्याची समस्या दूर करावी पाण्याचा पुरवठा कसा स्वच्छ होईल यासाठी प्रयत्न करावे . वर्षभरात किती पाणी सोडले   किंवा किती पाण्याचा पुरवठा करण्यात आला याची नोंद प्रशासनाकडे नसली तरी कुठल्या ग्राहकाकडे किती पाणीपट्टी कर थकीत आहे याची मात्र तंतोतंत नोंद ग्रामपंचायतकडे आहे. मात्र दूषित पाण्याच्या पुरवठ्यावर तेच प्रशासन मुग गिळून आहे.[ads id="ads2"]  

  दरवर्षी पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. नदीतील पाण्याचे शुद्धीकरण न करता सरळ नळाद्वारे नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे .दूषित पाणी प्यायलामुळे आजारांना सामोरे जावे लागते. जुलाब, उलटी, टायफॉइड, गॅस्ट्रो, विषाणू, जीवाणूंचे आजार, जंतूची वाढ यांसारखे आजार होतात. जलजन्य आजारांमुळे पोटांचे विकार बळावतात. जलजन्य आजारांमुळे गावांमध्ये साथ सुरू होण्याची भीती देखील असते.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️