पेपर मिलला भीषण आग ; कोट्यवधी रुपयांचे नुकसान : जळगाव जिल्ह्यातील घटना

 

जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील सुनसगाव शिवारातील पेपर मिलला रविवार (दि.28) आग लागल्याची घटना घडली. या आग्नितांडवात पेपर तसेच मिलची संपूर्ण यंत्रसामग्री जळून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.आग विझवण्यासाठी भुसावळसह जळगाव जिल्ह्यातून विविध ठिकाणच्या अग्निशमन दलालाल पाचारण करण्यात आले आहे. रविवार असल्यामुळे कंपनी बंद होती, त्यामुळे आत कुणीही कर्मचारी नसल्याने सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झालेली नाही.[ads id="ads1"] 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, भुसावळ तालुक्यातील सुनसगाव शिवारातील गट नं. १०८ मध्ये राजेंद्र चौधरी यांच्या मालकीची सुदर्शन पेपर मिल आहे. या ठिकाणी ड्युप्लेक्स नावाच्या इम्पोर्टेट पेपरची निर्मिती होते. देशात मोजक्याच ठिकाणी या पेपरची निर्मिती होते. त्यानुसार सुदर्शन पेपर मिलमध्ये या पेपरची निर्मिती होत विदेशात हा पेपर निर्यात होते. रविवार असल्याने आज दि. २८ रोजी कंपनी बंद होती. दरम्यान, सकाळी ११ वाजेच्या सुमारास कंपनीत अचानक आग लागली. आग इतकी भिषण होती की, सर्व सामग्री जळून खाक झाल्याने कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.[ads id="ads2"] 

४५० टन मालासह साहित्य जळून खाक 

या घटनेत कंपनीत तयार झालेला जवळपास ४५० टन ड्युप्लेक्स पेपरचा माल, कच्चामाल, यंत्र सामग्री आदी कोट्यवधीचे साहित्य जळून खाक झाले. आग इतकी भिषण होती की, दुरवरुन सुध्दा आगीचे लोळ दिसत होते. आगीची घटना लक्षात येताच स्थानिक नागरीकांनी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांना तसेच अग्निशमन विभागाला कळविण्यात आले. 

हेही वाचा: उद्योजक बनायचं आहे का ? मग आजच अर्ज करा.....महाराष्ट्र शासनातर्फे मिळणार व्यवसायासाठी तब्बल "इतके" रुपये

हेही वाचा: दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी : भारतीय डाक विभागात 12828 जागांसाठी भरती

हेही वाचा: अज्ञात वाहनाच्या धडकेत धमनार -वसमार रस्त्यावर बिबट्याचा जखमी होऊन प्रचंड प्रमाणात रक्तस्राव झाल्याने मृत्यू

हेही वाचा:  पेपर मिलला भीषण आग ; कोट्यवधी रुपयांचे नुकसान : जळगाव जिल्ह्यातील घटना

घटनेची माहीती मिळताच तालुका पोलीस स्टेशनचे पो.नि. विलास शेंडे, सहाय्यक पोलीस निरिक्षक अमोल पवार, पोहेकॉ. सुरज पाटील, गणेश गव्हाळे, जगदीश भोई यांच्यासह पथक, तलाठी जयश्री पाटील, सर्कल योगिता पाटील, महावितरणचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी भुसावळ, दीपनगर, जळगाव या ठिकाणाहून अग्निशमन बंब पाचारण करण्यात आले.होते. या बंबांनी आग आटेक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️