डॉ.बाबा आढाव यांच्या हस्ते अभिनेते किरण माने यांना सम्यक पुरस्कार प्रदान

 


पुणे (सुवर्ण दिप वृत्तसेवा)  : 'सम्यक पुरस्कार समिती ' तर्फे देण्यात येणारा ' सम्यक पुरस्कार ' पुरस्कार  चित्रपट अभिनेते किरण माने यांना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ बाबा आढाव यांच्या हस्ते प्रदान करण्यात  आला.  त्यांच्यासोबत गुलाब गजरमल, रामहरी ओव्हाळ, रमेश राक्षे , उत्तम वनशिव, शरद जाधव आणि प्रा. के.  व्ही. सोनकांबळे या मान्यवरांना सम्यक पुरस्कार प्रदान करण्यात आला. [ads id="ads1"]  

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी १० मे हा "स्वाभिमान दिन" म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून दरवर्षी सम्यक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर काम करणाऱ्या व जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन समता स्वातंत्र्य बंधुत्वतः ही मूल्य जपणाऱ्या मान्यवर व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. यंदाचे या पुरस्काराचे हे १५ वे वर्ष होते .[ads id="ads2"]  

पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम दि. १० मे २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच , पुणे येथे झाला.    कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी जेष्ठ आंबेडकरी विचारवंत  वसंत साळवे होते  तसेच वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराध्यक्ष  मुनवर कुरेशी हे कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित होते. एड.किरण कदम यांनी प्रास्ताविक केले.

याप्रसंगी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक स्वप्निल पवार, संतोष संखद आणि मेघानंद जाधव यांचा "संविधानात जिवंत घटनेचा शिल्पकार" हा आंबेडकरी जलसा सादर केला. मुख्य आयोजक नागेश भोसले आणि प्रा विलास घोगरे यांनी आभार मानले.

सम्यक पुरस्कार वितरण सोहळा २०२३,पुणे

बहुजन नायक मा. खासदार अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त * पुरस्कार वितरण हस्ते मा.डॉ.बाबा आढाव कष्टकऱ्यांचे कैवारी * कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. वसंतदादा साळवे (आंबेडकरी विचारवंत) * स्वागताध्यक्ष मा. मुनव्वर कुरेशी (पुणे शहराध्यक्ष-वंचित बहुजन आघाडी) * संयोजक मा. नागेश भोसले (संस्थापक अध्यक्ष- सम्यक पुरस्कार समिती) 1.पुरस्काराचे मानकरी मा.किरण माने (सिने अभिनेते) 2.गुलाब गजरमल ज्येष्ठ समाजसेवक 3.रामहरी ओव्हाळ मा.जि.अध्यक्ष-भारिप ब.म. 4.रमेश राक्षे ज्येष्ठ विचारवंत 5.उत्तम वनशिव मा.जि.अध्यक्ष-वंचित ब.आ. 6.शरद जाधव ज्येष्ठ समाजसेवक 7.प्रा.के.व्हि.सोनकांबळे आदर्श शिक्षक स्थळ- गणेश कला क्रिडा रंगमंच, स्वारगेट, पुणे. मा.स्वप्निल पवार मा.संतोष संखद मा.मेघानंद जाधव बुधवार दि. १०/०५/२०२३ रोजी वेळ - सायं ५ वाजता (सुप्रसिध्द पार्श्व गायक) आयोजक: सम्यक पुरस्कार वितरण समिती

Posted by Prabuddh Bharat on Wednesday, May 10, 2023

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️