सलीम पिंजारी (फैजपूर प्रतिनिधी ता. यावल)
अत्यंत कष्टाळू गरीब घरणातील मुल आई वडिलांनी अत्यंत कष्टमोल मजुरी करून मुलांना शिकवले व आई वडिलांच्या कष्टाचे सोन या मुलांनी करून दाखवलं असे मुंबई पोलिस पदी निवड झालेले पोलिस शिपाई यांचा री.पा.ई जिल्हाध्यक्ष मा.ईश्वर भाऊ इंगळे व त्यांच्या सपत्नीक यांनी यांच्या निवास्थानी सत्कार करण्यात आला व पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.[ads id="ads1"]
ईश्वर भाऊ इंगळे मनोगत व्यक्त करतांना म्हणाल,आज समाजात भूतकाळात उपेक्षित ठरलेला वर्ग शिक्षणातून उभा राहून स्वतःसह समाज व राष्ट्राच्या प्रगतीत हातभार लावतो आहे या मुलांनी आपल्या या क्षेत्रामध्ये योगदान देऊन न्यू गंड बाजूला सारून हिमतीने पुढे आलेले आहे आणि आज वाईट कामाचे लाज बाळगा चांगले काम करताना हिमतीने पुढे या.[ads id="ads2"]
मुलांनी व मुलींनी स्वतःसह इतरांचे संरक्षण करून कुटुंबांचा आधार व्हा कोणावरही अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःच्या अस्तित्व स्वतःच निर्माण करा अन्याय सहन करू नका व कोणावरही अन्याय करू नका त्यासाठी संविधानाने दिलेल्या अधिकार कायदे व शासनाच्या योजना यांचा अभ्यास करून इतर आपल्या भावांना व भगिनींना समजावून सांगा खरे खोटे ओळखून जीवनात यशस्वी होण्याचा मार्ग केवळ आणि केवळ दर्जेदार शिक्षणच देऊ शकते हे या मुलांनी करून दाखवले असे प्रतिपादन मा.ईश्वर भाऊ इंगळे यांनी दिले. पोलीस मध्ये निवड झालेले पैकी
अमोल मेढे (फैजपूर)
सुधीर तायडे (सूनोदा)
सागर शिरसाठ ( सूनोदा )
सागर तायडे (हिंगोणा
विशाल भालेराव ( फैजपूर)
यांचा सत्कार करण्यात आला.सत्कार प्रसंगी लखन भाऊ इंगळे राहुल भाऊ इंगळे गोकुळ पाटील (Psi) संदीप कोळी केतन तायडे सुपडू तायडे महिंद्र सपकाळे अक्षय डोळे रोहित गाढे साजन सोनवणे अनिकेत सुरवाडे विशाल सपकाळे भूषण मानकरे यूनुस तडवी रोहित मेढे प्रथम मेढे होते.
हेही वाचा: उद्योजक बनायचं आहे का ? मग आजच अर्ज करा.....महाराष्ट्र शासनातर्फे मिळणार व्यवसायासाठी तब्बल "इतके" रुपये