साक्री तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर बळीराजा पॅनलचे वर्चस्व,18 पैकी 16 जागावर दणदणीत विजय;साक्रीच्या आमदार मंजुळाताई गावित यांच्या वर्चस्वाला मोठा धक्का

 


साक्री (अकिल सादिक शहा)  : साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण १८ जागांसाठी काल सकाळी ८ वाजता येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या केंद्रात मतदानाला सुरुवात झाली  एकूण 93 % मतदान झाले आहे.तर दोन्ही गटाच्या समर्थकांसह मतदारांची केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.मतदानानंतर कालच सायंकाळी ५ वाजता साक्री कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मतमोजणीला सुरुवात झाली व रात्री उशिरा 9 वाजता निकाल घोषीत करण्यात आले.[ads id="ads1"] 

   १८ जागांसाठी ४१ उमेदवार रिंगणात होते शेतकरी विकास पॅनल व बळीराजा विकास पॅनल या दोन्ही पॅनलमध्ये सरळ चुरशीची लढत होती, निवडणुकीकडे तालुक्याचे व जिल्ह्याचे लक्ष लागले होते.तर प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.आता मतदार आपला कौल नेमका कोणाला देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.[ads id="ads2"] 

साक्रीच्या अपक्ष आमदार मंजुळाताई गावित, भाजपचे सुरेश पाटील विरुद्ध जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव दहिते,माजी खासदार बापू चौरे माजी आमदार डी एस अहिरे,शिवसेनेचे विशाल देसले यांच्या गटात होणार चुरस पहावयास मिळाली.

दोन्ही पॅनलमध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश असल्याने सत्ता कोणत्या पैनल कड़े जाणार यापेक्षा कोणत्या गटाकडे जाणार त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते मात्र साक्री तालुक्याच्या विद्यमान अपक्ष शिंदे गटाच्या मंजुळाताई गावित यांना जबरदस्त झटका देत 18 पैकी 16 जागांवर बळीराजा पॅनलचे उमेदवार निवडून आले आहेत तर शेेतकरी विकास पॅनल ला केेवळ दोन जागा मिळाल्या तर धुळे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष शिवाजी दहिते व कासारेचे लोकनियुक्त सरपंच विशाल देसले व माजी खासदार बापू चौरे यांच्या गटाचा मोठा विजय झाला असून आमदार मंजुळाताई गावित यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे .


*विजयी उमेदवार खालील प्रमाणे:-*

 १) ठाकरे ऋतुराज विजयकुमार

२) खैरनार नंदकुमार अभिमान

३) अहिरे शाईराम नाना

४) पाटील भानुदास रामदास

५) गिरासे  लादूसिंग सुरतसिंग

६) साळुंके दिपक पोपटराव

७) बाविस्कर बन्सीलाल वामन

८) बेडसे कलाबाई यशवंत

९) साबळे जिजाबाई संजय

१०) ठाकरे रवींद्र पोपटराव

११) पवार वसंत तुळशीराम

१२) बिरारीस जितेंद्र हिम्मतराव

१३) घरटे मुकुंदराव केशव

१४) राऊत ओंकार दाज्या

१५) पवार भास्कर गजमल

१६) कोठावदे किरण उद्धव १७)शाह राजेंद्र बिहारीलाल

१८) बागुल दिनकर सोनू

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️