यावल (सुरेश पाटील)
काल मंगळवार दि. 2 रोजी यावल शहरात काळा हनुमान मित्र मंडळातर्फे पशु चिकित्सा मोहीमेस पशुपालकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला तसेच काळा हनुमान मित्र मंडळाने शेतकऱ्यांच्या व पशुपालकांच्या हिताचा हा पशु चिकित्सा सामाजिक उपक्रम राबविल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.[ads id="ads1"]
शिवाजीनगर परिसरामध्ये पशु चिकित्सा कार्य मोहिमेचे आयोजन काळा हनुमान मित्र मंडळ डॉ.विवेक व्ही. अडकमोल यांच्यावतीने करण्यात आले, कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्रगतशील शेतकरी संतोषआप्पा भोलांकर हे होते शहरातील पशुपालकांचा मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला शेतकऱ्यां साठी पशु पालकांसाठी हा एक कौतुकास्पद उपक्रम होता सर्वत्र काळा हनुमान मित्र मंडळाचे कौतुक करण्यात येत आहे.[ads id="ads2"]
कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन सनीभाऊ कोळी यांनी बैल जोडीचे पूजन करून केले.एम.सी.पाटील, डॉ.संतोष बडे,पंचायत समिती डॉ.कोळंबे यांचे सहकाय लाभले डॉ.भगुरे डॉ.विवेक व्ही.अडकमोल डॉ. पवार,डॉ.प्रवीण इंगळे.डॉ. पराग बढे,डॉ.युवराज पाटील हे होते सूत्रसंचालन योगेश नेवे,खलील तडवी,पि.एन. दुसाने,उपस्थित होते. एकूण 400 गुरांना लाड्या, खुर्गट शेळ्यांना p p r लसीकरण व 30 गुरांना उपचार करण्यात आले.