प्रशासक व मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन सादर
यावल (सुरेश पाटील) यावल नगरपरिषद कार्यालयातील दिव्यांग कर्मचारी मोहनदास सोनार यांना सेवानिवृत्तीनंतरच्या सर्व रकमा सेवानिवृत्तीच्या दिवशी म्हणजे दि. 31 मे 2023 रोजी एक रकमी मिळायला पाहिजे अशा मागणीचे निवेदन यावल नगरपरिषद प्रशासक साहेब तसेच मुख्याधिकारी यांना दीड महिन्यापूर्वी म्हणजे दि. 10 एप्रिल 2023 रोजी देण्यात आले आहे.यावल नगरपरिषद प्रशासन यावल न.पा.सेवेतून सेवानिवृत्त होणाऱ्या अपंग कर्मचाऱ्यास सेवानिवृत्तीच्या दिवशीच सर्व रकमा देणार आहे किंवा नाही याकडे त्यांच्या कुटुंबीयांसह सर्वांचे लक्ष वेधून आहे.[ads id="ads1"]
यावल नगरपरिषद दिव्यांग कर्मचारी मोहनदास सोनार यांनी दि.10 एप्रिल 2023 रोजी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,मी दिव्यांग राखीव जागेवर दि.4/4/1994 पासून न.प. यावल येथे शिपाई पदावर सेवेत असून 29 वर्षाचे सेवेनंतर दि.31 मे 2023 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहे.माझे वय 60 वर्षे होत असून मला तिव्र स्वरुपाचे अपंगत्व असलेने उभे राहणे / तसेच चालणे शक्य होत नाही.माझे अपंगत्वाची तिव्रता वाढत असून मी किडनी/मुत्राशयाचे विकाराने पिडीत आहे.तसेच माझा मुलगा पूणे येथे अभियांत्रीकी महाविद्यालयात प्रथम वर्षाचे उच्च शिक्षण घेत आहे.सेवानिवृत्ती नंतर मला मिळणारे अल्पशा वेतनातून माझे उपचार व मुलाचे उच्च शिक्षण पूर्ण होवू शकत नसलेने मला जिवन जगणे पासून व मुलाचे शिक्षणापासून वंचीत रहावे लागणार आहे.[ads id="ads2"]
मला उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नसल्याने व अपंगत्वामुळे कोणताही कामधंदा करू शकत नसल्याने वरील माझ्या व कुटुंबीयांच्या गरजा हया मला सेवानिवृत्ती नंतर मिळणारे रकमांवर अवलंबून आहेत.नगरपरिषद स्थापने पासून दिव्यांग राखीव जागेवरील मी एकमेव दिव्यांग कर्मचारी असून माझे शिक्षण एम.ए.उच्चशिक्षित असलेने सुरवाती पासूनच मला वर्ग -4 चे वेतनामध्ये वर्ग -3 लिपीक पदाचे काम देणेत आले असून मी इमाने
इतबारे 29 वर्ष नगर परिषदेची सेवा केली आहे. दिव्यांग पुनर्वसन व विकासचे शासनाचे धोरण असून त्यांचे कल्याणासाठी शासन सतत प्रयत्नशील आहे.
तरी माझे अर्जाचा व वरील सत्य परीस्थीतीचा दिव्यांग कर्मचारी विशेष बाब म्हणून सहानुभूतीने विचार होवून मला माझे सेवानिवृत्ती नंतरच्या सर्व रकमा सेवानिवृत्तीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे दि.31 मे 2023 रोजी एक रकमी मिळावी व मला पूढील जिवन जगणे व मुलाचे उच्चशिक्षणाचे स्वप्न पूर्ण होणेसाठी हातभार/ सहकार्य मिळावे अशी मागणी यावल नगरपरिषद कर्मचारी मोहनदास सोनार यांनी केली आहे. यावल नगरपरिषद प्रशासन खरोखरच यावल नगरपरिषद दिव्यांग कर्मचाऱ्यांची वस्तुस्थिती लक्षात घेऊन सेवानिवृत्तीच्या दिवशी सर्व रकमा देणार का याकडे मोहन सोनार आणि त्यांच्या कुटुंबीयांचे लक्ष वेधून आहे.