चक्क दुसऱ्या मजल्यावर घरकुलाचे बांधकाम ; यावल नगरपरिषदेचा असाही प्रताप !


यावल (सुरेश पाटील) यावल नगरपालिका कार्यक्षेत्रात आणि यावल नगरपालिका माजी उपाध्यक्ष सौ.रुखमाताई महाजन यांच्या घराजवळ आणि  जेडीसीसी बँक शाखा यावल जवळ नगरपरिषदेतर्फे मंजूर घरकुल बांधकाम अनाधिकृतपणे चक्क दुसऱ्या मजल्यावर करण्यात आले असून नगरपरिषदेने कोणतेही मोजमाप न करता घरकुलाचा निधी संबंधित घरमालकास दिल्याची तक्रार यावल नगरपरिषदेकडे करण्यात आली यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.[ads id="ads1"] 

          विजय नथू महाजन रा.यावल यांनी दि.11/11/ 2022 व दि.3/ 4 /2023 रोजी यावल नगरपालिकेत लेखी अर्ज दिले आहेत त्यात म्हटले आहे की संबंधित व्यक्तीच्या नावावर घरकुल मंजूर झाले असून कोणतेही मोजमाप झाले नाही तरी सुद्धा यावल नगरपालिकेने घरकुल मंजूर झालेल्या व्यक्तीस निधी दिला घरकुल मंजूर करून सामने वाला यास पेमेंट करण्यात आले. [ads id="ads2"] 

  सामनेवाला यांनी अनधिकृतपणे अतिक्रमण करून पत्राचे शेड व बांधकाम केले आहे संबंधिता विरुद्ध यापूर्वी सुद्धा अर्ज केलेला आहे तरी सुद्धा कोणतीही कारवाई झालेली नाही तरी आपण या घरकुलाची रीतसर चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा: उद्योजक बनायचं आहे का ? मग आजच अर्ज करा.....महाराष्ट्र शासनातर्फे मिळणार व्यवसायासाठी तब्बल "इतके" रुपये

हेही वाचा: दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी : भारतीय डाक विभागात 12828 जागांसाठी भरती

       घरकुल ज्या ठिकाणी बांधकाम करण्यात आले त्या ठिकाणी दहा ते पंधरा वर्षांपूर्वी आधी खालच्या मजल्यावर बांधकाम झालेले आहे आता वर दुसऱ्या मजल्यावर घरकुल बांधकामाची परवानगी यावल नगरपालिकेला देता येते का? असा कायदेशीर प्रश्न उपस्थित होत आहे. यावल नगरपालिकेतील संबंधित बांधकाम विभागातील अधिकारी मात्र या घरकुलामुळे अडचणीत येणार असल्याचे यावल शहरात बोलले जात असले तरी यावल नगरपालिकेने संबंधित घरकुल मंजूर झालेल्या व्यक्तीविरुद्ध तात्काळ कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️