साक्री (अकील सादिक शाह) : विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून म्हणजेच भाजप कडून होत असलेल्या यंत्रणांच्या गैरवापराची अनेक उदाहरणे वेळोवेळी जनतेला अनुभवायला येत आहेत.
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय आमदार श्री.जयंतरावजी पाटील साहेब यांना जाणून बुजून त्रास देण्याच्या उद्देशाने आज ईडी कार्यालयात बोलविण्यात आले.[ads id="ads1"]
यासंदर्भात राज्य व केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आज साक्री येथे धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष श्री.जितेंद्र उत्तमराव मराठे व साक्री तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष पवन संदानशीव , यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार सो.साक्री यांना निवेदन देऊन केंद्र व राज्य सरकारच्या या दडपशाही धोरणाचा निषेध करण्यात आला.
यावेळी पदाधिकाऱ्यांकडून केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने व घोषणाबाजी करण्यात आली, साक्री तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख विलास देसले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य विजय भामरे, धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सयाजीराव ठाकरे , साक्री तालुका सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष भैय्या साळवे, साक्री तालुका राष्ट्रवादी अल्पसंख्यांक आघाडीचे करीम शहा, धुळे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष कल्पेश सोनवणे, साक्री तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस किरण देवरे,साक्री तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मिलिंद पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व विविध फ्रंटल सेलचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.[ads id="ads2"]
यावेळी बोलतांना धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष श्री जितेंद्र मराठे यांनी सांगितले की, लोकशाहीमध्ये सक्षम विरोधी पक्ष आणि त्यांच्या अभिव्यक्तीला महत्त्व आहे. पण आज देशात विशेषतः बिगर भाजप शासित राज्यामध्ये आणि महाराष्ट्रात विरोधकांचा आवाज दाबण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातोय. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यासाठी लोकशाही मूल्यांना पायदळी तुडवून सत्तेचा गैरवापर होत आहे. ईडी, सीबीआय, एनआयबी अशा केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग विरोधी पक्षांची मुस्कटदाबी करण्यासाठी सत्ताधारी करत आहेत.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींपेक्षा जास्त मोठा भ्रष्टाचार खटला ठेवला गेला. त्यांना १३ महिने तुरुंगात ठेवण्यात आलं. मात्र चौकशीत हे सत्य नसल्याचे निष्पन्न झाले. माजी मंत्री नवाब मलिक यांनाही त्यांनी काही चुकीच्या गोष्टी लोकांसमोर आणल्या म्हणून तुरुंगात डांबण्यात आलं आहे. ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या जावयाला अटक करण्यात आली. ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या मागेही चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला आहे. यंत्रणांचा हा गैरवापर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच नाही तर अन्य विरोधी पक्षातील नेत्यांबाबतही सुरू आहे.
साम, दाम, दंड, भेद कोणत्याही मार्गे सत्ता मिळवण्यासाठी बिगर भाजप राज्यात भाजपचे सुरू असलेले उद्योग संपूर्ण देशाने पाहिले आहेत. फोडाफोडीचे राजकारण करून आणि आमदार पळवून राज्यांमधील सरकारं पाडण्याचे असत्याचे प्रयोग सुरू आहेत. महाराष्ट्र राज्यात तर आता खोके सरकार अशीच सद्याच्या सरकारची ओळख झाली आहे.
विरोधकांना संपविण्याचे असे विध्वंसात्मक राजकारण या ईडी सरकारने न थांबविल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल व याची सर्व जबाबदारी केंद्र व राज्य शासनाची राहील असा इशारा यावेळी बोलताना श्री. जितेंद्र मराठे यांनी दिला.