साक्री तालुक्यातील महिर येथे खा. हिनाताई गावित यांच्या हस्ते विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न


साक्री (अकिल सादिक शाह) महिला बचत गटांना अर्थसहाय्य करून गृहउद्योग सारख्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून महिलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न असेल तसेच महिर गावातील गोरगरीबांना शबरी घरकुल योजना, रमाई घरकुल योजनांच्या माध्यमातून घरकुल देण्यात येतील व गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मी व आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित सदैव कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन संसदरत्न खासदार डॉ.हिनाताई गावित यांनी केले. [ads id="ads1"] 

  महिर ता. साक्री येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन सोहळा प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे आयोजन सरपंच रमेशभाऊ सरक यांनी केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती हर्षवर्धन दहिते होते. जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना, डोंगरी क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत महीर ते कृष्णा नगर रस्त्यावर पूल बांधकाम करणे, ठक्कर बाप्पा सुधारणा कार्यक्रमांतर्गत आदिवासी वस्तीमध्ये रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत जलशुद्धीकरण यंत्र बसवणे अशा एकूण दीड कोटी रुपये खर्चाच्या कामांचे भूमिपूजन खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांच्या शुभहस्ते करण्यात आले. [ads id="ads2"] 

  यावेळी कृषी, पशुसंवर्धन सभापती हर्षवर्धन दहिते यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की महीर गावाच्या विकासासाठी आम्ही सदैव सरपंच रमेश भाऊ सरक यांच्या पाठीशी खंबीर उभे आहोत. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती डॉ. बन्सीलाल बाविस्कर, जिल्हा परिषद सदस्य विजय ठाकरे, साक्री नगरपंचायत च्या नगराध्यक्ष जयश्रीताई पवार, उपनगराध्यक्ष बापूसाहेब गीते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक प्रा. रवींद्र ठाकरे, मुकुंदराव घरटे, राजेंद्र शाह, लादुसिंग गिरासे, देखरेख संघाचे माजी चेअरमन भानुदास भदाणे, पंचायत समितीचे माजी गटनेते उत्पल नांद्रे, भाजपाचे तालुका सरचिटणीस प्रदीप नांद्रे, म्हसदी चे माजी सरपंच कुंदन देवरे, निजामपूरचे माजी सरपंच अजितचंद्र शाह, देगावचे सरपंच सुधीर अकलाडे, मलांजन चे माजी सरपंच ऋषिकेश मराठे, धमनारचे माजी सरपंच दिनेश सोनवणे, नगरसेवक दीपक वाघ, एडवोकेट पूनम शिंदे- काकुस्ते, भाजपा ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष महेंद्र देसले, सय्यदनगरचे माजी सरपंच गुलाब चव्हाण, उभंड चे सरपंच योगेश निकम, टेम्भे चे सरपंच सखाराम कारंडे, वाघापूरचे सरपंच भिवा बोरकर,सामोडे चे माजी सरपंच पंकज दहिते, रायपूरचे नारायण थोरात, मुन्ना देवरे, अष्टाने विकासो चे संचालक प्रवीण देवरे शेणपूर चे गटनेते सागर काकुस्ते, अतुल दहिते, दिग्विजय देसले, सतिश पगार, आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच रमेश भाऊ सरक, सूत्रसंचालन प्रा. शिवाजी देवरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामसेवक जितेंद्र बोरसे, उपसरपंच देविदास बागुल, जगन सरक, आनंदा सरक, विजय सरक, रावण सरक, नाना भिल, संदीप सरक, सत्तू नाईक, काळू सरक, आप्पा मारनर, वेडू महाराज, आनंदा चिमण, रमेश बापू सरक, काळू भिल, लालजी झुगा, उत्तम सरक, संजय सरक यांनी विशेष परिश्रम घेतले.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️