ऑनलाईन ट्रेडिंग मध्ये गुंतवणुक केल्यास मोठया प्रमाणावर नफा होईल असे सांगुन रावेरच्या तरुणाची फसवणूक : गुजरातमधील आरोपीला अटक


 रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर तालुक्यातील (Raver Taluka) तरुणाची ऑनलाईन ट्रेंडींगमध्ये(Online Trading) गुंतवणुकीच्या नावाखाली नऊ लाख 30 हजारांची फसवणूक झाली होती. जळगाव सायबर सेलने (Jalgaon Cyber Cell) या गुन्ह्याचा पर्दाफाश करीत गुजरात राज्यातील भावनगर(Bhavnagar,Gujrat) येथून रविवारी संशयिताला अटक केली. विजय उर्फ अजय दयाभाई कलसरीया ( वय 33, अम्रेली, भावनगर, गुजरात)असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्याच्याकडून गुन्ह्यातील पाच लाख रुपये, एटीएम व मोबाईल जप्त करण्यात आला.[ads id="ads1"] 

भरपूर नफा मिळेल या आमिषाने केली फसवणूक

रावेर तालुक्यातील (Raver Taluka) एकाची ऑनलाईन ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणावर नफा मिळवून देण्याच्या नावाखाली तब्बल नऊ लाख 30 हजारांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात (Jalgaon Cyber Police Station) ऑनलाईन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. [ads id="ads2"] 

  सायबर सेललने फिर्यादीचे व्हॉटसअॅप आणि बँकेतील झालेले व्यवहारच्या मदतीने संशयित आरोपी हा गुजरात राज्यातील भावनगर (Bhavnagar,Jalgaon) येथील असल्याचे निष्पन्न केले. जळगाव सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस (Jalgaon Cyber Police Station) निरीक्षक अशोक उतेकर यांनी सायबर पथकातील पोलीस उपनिरीक्षक दिगंबर थोरात, हवालदार प्रवीण वाघ, दिलीप चिचोले, गौरव पाटील यांच्या पथकाला रवाना केल्यानंतर रविवारी संशयित आरोपी विजय उर्फ अजय दयाभाई कलसरीया (33) यास अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक उतेकर करीत आहे.

सायबर पोलीस स्टेशन जळगाव कडून नागरीकांना जाहीर आवाहन

 जळगाव सायबर पोलीस स्टेशन जळगाव कडून जिल्ह्यातील नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे की, ऑनलाईन ट्रेडिंग मध्ये पैसे गुंतवणुक करतांना त्या अॅप्लीकेशनची सविस्तर खात्री करावी. ऑनलाईन ट्रेडिंग अॅप इन्स्टॉल करतांना आपले संपर्क (Contact) यादी, गॅलरी, टेक्स्ट मेसेज याची परवानगी देवु नये जेणेकरून फसवणुक होणार नाही. तसेच कुठल्याही अनोळखी व्यक्ती वा अॅपव्दारे ऑनलाईन व्यवहार करणे टाळावेत व ऑनलाईन व्यवहारांचे पासवर्ड नेहमी स्ट्रॉग ठेवावेत. तसेच कोणी हि अनोळखी व्यक्तींना स्वताः चे नावे बँक खाते तयार करुन देवु नये.

हेही वाचा: उद्योजक बनायचं आहे का ? मग आजच अर्ज करा.....महाराष्ट्र शासनातर्फे मिळणार व्यवसायासाठी तब्बल "इतके" रुपये

हेही वाचा: दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी : भारतीय डाक विभागात 12828 जागांसाठी भरती

हेही वाचा:  पेपर मिलला भीषण आग ; कोट्यवधी रुपयांचे नुकसान : जळगाव जिल्ह्यातील घटना

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️