विशेष सहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांनी हयातीचे व उत्पन्नाचे दाखले सादर करा :- रावेर तहसीलदार बंडू कापसे यांचे आवाहन

 


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) महाराष्ट्र  शासनाच्या वतीने महसूल विभागामार्फत संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दपकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग योजना इत्यादी योजना लाभार्थ्यासाठी राबविल्या जातात. या लाभार्थिना दर वर्षी मे ते जून महिन्यामध्ये हयातीचे आणि उत्पन्नाचे दाखले सादर करावयाचे असतात.[ads id="ads1"] 

   परंतू मे महीना संपण्यात आला तरी अद्याप सदरचे कागदपत्र जमा झालेले नसल्याने लाभार्थिनी संबंधीत तलाठ्याकडे समक्ष हयातीचा दाखला आणि उत्पन्नाचा दाखला  येत्या १५ जून  २०२३ पर्यंत सादर करण्याचे आवाहन रावेर चे तहसीलदार बंडू कापसे,आणि  नायब तहसीलदार संजय तायडे यांनी केले आहे.[ads id="ads2"] 

सामाजिक न्याय व विशेष विभाग यांचेकडील शासन निर्णय दि. २० ऑगस्ट २०१९ अन्वये संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना व इंदिरागांधी राष्ट्रीय वृध्दपकाळ योजना, इंदिरागांधी राष्ट्रीय विधवा योजना, इंदिरागांधी राष्ट्रीय दिव्यांग योजना या सर्व योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी दरवर्षी मे व जुन महिन्या मध्ये हयातीचे दाखले व उत्पन्नाचे  दाखले  सादर करायचे असतात त्या अनुषंगाने आपले हयातीचे दाखले लाभथ्यांनी आपले गावातील तलाठी यांचेकडे समक्ष उपस्थित राहून अगर तहसिल कार्यालय संजय गांधी शाखा रावेर येथे उपस्थित राहुन जमा करण्यात यावे.

हेही वाचा: उद्योजक बनायचं आहे का ? मग आजच अर्ज करा.....महाराष्ट्र शासनातर्फे मिळणार व्यवसायासाठी तब्बल "इतके" रुपये

   तसेच लाभाथ्यां व्यतिरिक्त अन्य नातेवाईक त्रयस्थ इसम यांनी दाखले परस्पर देण्यात येवू नये. सदर लाभार्थी यांनी हयातीच्या दाखल्या सोबत हयातीचा दाखला व मोबाईल नंबर, उत्पन्नाचा दाखला, बँकेचे पासबुक झेरॉक्स प्रत व बँकेला संलग्न असलेला मोबाईल नंबर, आधारकार्ड झेरॉक्स प्रत दि. १५ जून पर्यंत न चुकता सादर करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️