रावेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार : रावेर पोलिसात गुन्हा दाखल

 


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर तालुक्यातील (Raver Taluka)  एका गावातील अल्पवयीन तरुणीशी मैत्री वाढवून नंतर तिच्यावर अनेकदा अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संशयित शाहरूख सरवर तडवी राहणार कोरपावली, ता. यावल जि. जळगाव(Korpawali Taluka Yawal) या तरुणाविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.[ads id="ads1"] 

मैत्री संबंध वाढवत केला अत्याचार

रावेर तालुक्यातील(Raver Taluka) एका गावातील 16 वर्ष सहा महिने वयाची अल्पवयीन तरुणी कुटूंबियांसह वास्तव्यास आहे. गेल्या सहा महिन्यांपूर्वी संशयित शाहरूख सरवर तडवी राहणार कोरपावली, ता. यावल(Korpawali Taluka Yawal) हा तरुणीच्या संपर्कात आल्यानंतर त्याने तरुणीसोबत मैत्री केली व नंतर तिचा विश्वास संपादन करीत तिला लग्नाचे आमिष देत तीन ते चार वेळा रावेर तालुक्यातील (Raver Taluka) एका गाातील शेतरस्त्यावर अत्याचार केला. [ads id="ads2"] 

  पीडीतेने लग्नाची विचारणा करताना आरोपीने कानावर हात ठेवल्याने पीडीतेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने रावेर पोलीस ठाणे (Raver Police Station) गाठून तक्रार दिल्यानंतर संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. रावेर पोलीस स्टेशनचे (Raver Police Station) पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन नवले करीत आहेत.

हेही वाचा: उद्योजक बनायचं आहे का ? मग आजच अर्ज करा.....महाराष्ट्र शासनातर्फे मिळणार व्यवसायासाठी तब्बल "इतके" रुपये

हेही वाचा:  विशेष सहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांनी हयातीचे व उत्पन्नाचे दाखले सादर करा :- रावेर तहसीलदार बंडू कापसे यांचे आवाहन

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️