रायगड जिल्ह्यातील 108 रुग्णवाहिका सेवे संदर्भात जिल्हा नियंत्रण समितीची बैठक दरमहा आयोजित करणे हे समिती सचिव म्हणून cs श्री सुहास माने यांचे कर्तव्य होते गेल्या तीन वर्षांत त्यांनी हे केलेले नाही . मयत रुग्ण महिला सौ रमा आंग्रे यांचा रुग्णवाहिका सेवेतील हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला यासाठी दोषीवर गुन्हा दाखल करण्यासाठी रमेश नामदेव देवरूखकर (पत्रकार) यांनी अलिबाग पोलिसांना अर्ज केला होता पण पोलिसांनी अर्धवट चौकशी करत गुन्हा दाखल करण्यास हयगय केली आहे. [ads id="ads2"]
रुग्णालयात काम करणारे डायलेसिस टेक्निशियन अनिकेत वाडकर यांची फसवणूक करीत बेकायदेशीर पद्धतीने आधी तात्पुरती सेवासमाप्ती दाखविली व आज अखेर वर्षभर कामापासून वंचित ठेवले आहे. डायलेसिस टेक्निशियन श्री सर्वेश कोळगावकर यांची ड्युटीलिस्ट अद्ययावत ठेवण्यात हलगर्जीपणा करून त्याचे वेतन थकित ठेवले आहे व बेकायदेशीर पद्धतीने सेवा समाप्ती केली आहे.वरील सर्व मुद्द्याबाबत अर्ज विनंती करून कुठल्या प्रकारची दखल न घेतल्यामुळे हे जाहीर उपोषण करण्यात आले आहे.