फ्री प्रेस ऑनलाईन न्यूज आणि मुक्त पत्रकार संघाचे रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्रदिनी उपोषण


शुभम वाकचौरे (पुणे जिल्हा प्रतिनिधी) फ्री प्रेस ऑनलाईन न्यूज आणि मुक्त पत्रकार संघाचे रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्रदिनी जाहीर उपोषण रायगड जिल्हाअधिकारी कार्यालयासमोर, आलिबाग उपोषणकर्ते-श्री. वाडेकर नितीन वामन, श्री. देवरूखकर रमेश नामदेव पत्रकार यांचे सिव्हील हॉस्पिटलचा भ्रष्टाचार आणि जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष या विरोधात 1मे 2023 रोजी जाहीर उपोषण करण्यात आले आहे.[ads id="ads1"] 

  रायगड जिल्ह्यातील 108 रुग्णवाहिका सेवे संदर्भात जिल्हा नियंत्रण समितीची बैठक दरमहा आयोजित करणे हे समिती सचिव म्हणून cs श्री सुहास माने यांचे कर्तव्य होते गेल्या तीन वर्षांत त्यांनी हे केलेले नाही .  मयत रुग्ण महिला सौ  रमा आंग्रे यांचा रुग्णवाहिका सेवेतील हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला यासाठी दोषीवर गुन्हा दाखल करण्यासाठी रमेश नामदेव देवरूखकर  (पत्रकार) यांनी  अलिबाग पोलिसांना अर्ज केला होता पण पोलिसांनी अर्धवट चौकशी करत गुन्हा दाखल करण्यास हयगय केली आहे. [ads id="ads2"] 

   रुग्णालयात काम करणारे डायलेसिस टेक्निशियन अनिकेत वाडकर यांची फसवणूक करीत बेकायदेशीर पद्धतीने आधी  तात्पुरती  सेवासमाप्ती दाखविली व आज अखेर वर्षभर कामापासून वंचित ठेवले आहे. डायलेसिस टेक्निशियन श्री सर्वेश कोळगावकर यांची ड्युटीलिस्ट अद्ययावत ठेवण्यात  हलगर्जीपणा करून  त्याचे वेतन थकित ठेवले आहे व बेकायदेशीर पद्धतीने सेवा समाप्ती केली आहे.वरील सर्व मुद्द्याबाबत अर्ज विनंती करून कुठल्या प्रकारची दखल न घेतल्यामुळे हे जाहीर उपोषण करण्यात आले आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️