पाचोरा (सुवर्ण दिप वृत्तसेवा) पाचोरा तालुक्यातील लासगाव (Lasgaon, Pachora) येथील विवाहितेने आपल्या पाच महिन्याच्या चिमुकल्यासह शेती शिवारातील विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना मंगळवारी ३० मे रोजी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.[ads id="ads1"]
सदर घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये (Pachora Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लासगाव ता. पाचोरा येथील आरिफ शेख यांचा विवाह गावातीलच त्यांचे मामाची मुलगी लजिनावी हिच्याशी झाला होता. लग्नानंतर या दाम्पत्यांना पुत्ररत्न प्राप्त होवुन त्याचे नाव असद ठेवण्यात आले. बोलता बोलता असद हा पाच महिन्याचा झाला. २८ मे २०२३ रोजी गावात समाज बांधवातील लग्न असल्याने आरिफ शेख यांच्या परिवारास आमंत्रित करण्यात आले होते.[ads id="ads2"]
आरिफ शेख हे परिवारासह लग्नात सहभागी होण्यासाठी गेले. मात्र लजिनाबी यांनी सांगितले की, असद व मी थोड्यावेळात येतो. आरिफ शेख व त्यांचे आई, वडील लग्न समारंभात निघुन गेले. मात्र खुप वेळ होवुनही लजिनाबी ह्या लग्नात पोहचल्या नाही. यावेळी आरिफ शेख यांनी घर गाठले असता लजिनाबी व असद हे घरी नसल्याचे निदर्शनास आले. यावेळी लजिनाबी व असद यांचा सर्वत्र शोध घेतला असता ते मिळुन आले नाही. शेवटी हताश होऊन आरिफ शेख यांनी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये (Pachora Police Station) लजिनाबी व असद यांची बेपत्ता झाल्याची नोंद केली. दरम्यान मंगळवारी ३० मे रोजी गावातील शेत शिवारातील विहीरीत लजिनाबी व असद यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ, पोलिस कॉन्स्टेबल मुकुंद परदेशी, राहुल बेहरे, दिलीप वाघमोडे हे पथक व रुग्णवाहिका चालक अमोल पाटील घटनास्थळी दाखल होवून घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा करून लजिनाबी आरिफ शेख व असद आरिफ शेख यांचे मृतदेह रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली सामनेर बीट चे पोलिस कर्मचारी हे करीत आहे