गावठी बंदुकांसह तलवारी, चॉपर, जिवंत काडतुसे जप्त; जळगाव जिल्हा पोलिसांची कारवाई

 


जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी धडक मोहीम राबविण्यात आली. त्यात चार गावठी बंदुकांसह पाच तलवारी, दोन चॉपर, चाकू व जिवंत काडतुसे, असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दिली.[ads id="ads1"] 

जिल्हा पोलीस दलाकडून गुन्हेगारांवर एमपीडीए, मोक्का, तडीपारीच्या कारवाया सुरू आहेत. एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत दरोड्याच्या प्रयत्नातील चौघांना अटक करण्यात आली. स्वप्नील ऊर्फ गोल्या ठाकूर (१९), निशांत चौधरी (१९, दोन्ही रा. शंकररावनगर, जळगाव), पंकज राठोड (१९, रा. तुकारामवाडी, जळगाव), यश शंकपाळ (१९, हरिओमनगर, आसोदा रोड, जळगाव) यांना अटक करण्यात आली. दरोड्याच्या साहित्यासह बंदूक, तीन जिवंत काडतुसे, दोन दुचाकी आदी साहित्य जप्त करण्यात आले.[ads id="ads2"] 

भुसावळ येथील कारवाईत वाल्मीकनगर परिसरातून ललित खरारे (२२), जितेंद्र बोयत (२३), पवन खरारे (२७ सर्व रा. वाल्मीकनगर, भुसावळ) यांच्याकडून गावठी बंदूक, दोन जिवंत काडतुसे, दोन भ्रमणध्वनी संच, दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कंडारी (ता. भुसावळ) गावातील मयूर मोरे व कल्पेश राजू मोरे यांच्याकडून गावठी बंदूक, पाच तलवारी व एक काडतूस जप्त करण्यात आले. 

हेही वाचा: उद्योजक बनायचं आहे का ? मग आजच अर्ज करा.....महाराष्ट्र शासनातर्फे मिळणार व्यवसायासाठी तब्बल "इतके" रुपये

अडावद येथे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन-पाटील, कर्मचारी रवींद्र पाटील, दीपक शिंदे यांच्या पथकाने बसमधील रमेश भिलाला याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची झाडाझडती घेतली असता, त्याच्याकडे गावठी बंदूक, जिवंत काडतूस मिळून आले.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️