लेफ्टनंट जनरल अमरदीप सिंग औजला बनले भारतीय लष्कराचे नवे MGS


दिल्ली (वृत्तसंस्था) : चिनार कॉर्प्स कमांडर लेफ्टनंट जनरल अमरदीप सिंग औजला यांची भारतीय लष्कराचे नवीन मास्टर जनरल सस्टेनर (MGS) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.[ads id="ads1"] 

लष्करप्रमुखांच्या आठ प्रमुख स्टाफ अधिकाऱ्यांपैकी एक असणार

लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरदीप सिंह औजला हे लष्कर प्रमुखांच्या आठ प्रमुख स्टाफ अधिकाऱ्यांपैकी एक असतील.

गेल्या वर्षी मे महिन्यापासून ते चिनार कॉर्प्सचे कमांडिंग करत आहेत. एलओसी (LOC) आणि तेथील अंतर्गत सुरक्षा स्थिती राखण्यात त्यांचा मुख्य सहभाग आहे. राजपुताना रायफल्स रेजिमेंटमध्ये नियुक्त झालेले औजला डिसेंबर 1987 मध्ये लष्करात दाखल झाले होते.[ads id="ads2"] 

इन्फंट्री स्कूल बेळगाव येथे प्रशिक्षक म्हणूनही कार्यरत

औजला यांनी काश्मीर खोऱ्याचा चांगला अनुभव आहे. उधमपूर येथील नॉर्दर्न कमांडच्या मुख्यालयात दहशतवादविरोधी कारवायांवर देखरेख करणारे मेजर जनरल म्हणूनही त्यांनी काम केले आहे. औजला हे कमांडो विंग, इन्फंट्री स्कूल बेळगाव येथे प्रशिक्षक म्हणूनही कार्यरत आहेत.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️