या अपघातात रिक्षातील 21 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर या अपघातात दोन जण जखमी झाले आहे. अश्विनी गुलाब भामरे असे मयत तरुणीचे नाव आहे. हि घटना अमळनेर तालुक्यातील मेहरगाव फाट्याजवळ (Mehergaon Fata) घडली.या अपघात प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.[ads id="ads2"]
नेमकी काय आहे घटना?
धुळे जिल्ह्यातील मेहरगाव(Mehargaon Fata Dist Dhule) येथील रहिवासी अश्विनी गुलाब भामरे ही अमळनेर येथील यात्रा पाहण्यासाठी १३ एप्रिल रोजी मेहरगाव येथून अमळनेर तालुक्यातील(Amalner Taluka) खेडी खुर्द प्र.ज. येथे राहणाऱ्या तिच्या मोठ्या बहिणीसह मेव्हण्यांकडे आली होती. रात्री यात्रेत जायचं ठरल्याने त्यानुसार रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अश्विनी ही तिच्या बहिणीची सासू, बहिणीची नणंद या दोघांसोबत एमएच १९ बीजे ८९९६ या क्रमाकांच्या रिक्षातून अमळनेरकडे जाण्यासाठी निघाले. अश्विनीची बहिण आणि मेव्हणे हे दोघे दुचाकीवरुन रिक्षासोबत मार्गस्थ झाले.
हेही वाचा: उद्योजक बनायचं आहे का ? मग आजच अर्ज करा.....महाराष्ट्र शासनातर्फे मिळणार व्यवसायासाठी तब्बल "इतके" रुपये
दरम्यान मेहेरगाव फाट्याजवळ टाटा मॅजिक या वाहनाने रिक्षाला कट मारला. यामुळे रिक्षा रस्त्यालगत उलटली. या अपघातात रिक्षात बसलेल्या अश्विनीच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून तिचा जागीच मृत्यू झाला. तर रेखाबाई पाटील व वर्षा हर्षल बोरसे हे दोन्ही जखमी झाले.
अश्वीनीचे नुकताच जमले होते लग्न
मयत अश्विनीचे काही दिवसापूर्वी लग्न जमले होते. लग्नाची तारीख ठरणार तोच अपघाताच्या रुपाने अश्विनी हिच्यावर काळाने झडप घातली आणि लग्नापूर्वीच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातप्रकरणी रविवारी दुपारी निलेश प्रवीण पाटील यांच्या फिर्यादीवरुन वाहनावरील चालकाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.