राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत साळवे हायस्कूलची रेणुका महाजन कास्यपदक पटकावून राज्यात तिसरी

 


   चेअरमन,कार्यकारीणी सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी  केले कौतुक व अभिनंदन

   साळवे इंग्रजी विद्यालय साळवे ता.धरणगाव ची इयत्ता बारावीची विद्यार्थिनी रेणुका रामकृष्ण महाजन हिने प्रथम तालुकास्तरावर, जिल्हा स्तरावर नंतर विभागीय स्तरावर सुवर्णपदक व राज्यस्तरावर मजल मारून तिने तिसऱ्या स्थानावर कांस्यपदक पटकावून जळगाव जिल्ह्याचा मान राज्यस्तरावर उंचावला.[ads id="ads1"] 

   त्याबद्दल ग्राम सुधारणा मंडळ, साळवे चे अध्यक्ष डॉक्टर गिरीश नारखेडे, उपाध्यक्ष जी एन पाटील, खजिनदार- डॉ. चंद्रकांत नारखेडे व कार्यकारीणी सदस्य आणि मुख्याध्यापक ए एस पाटील वर्गशिक्षक - भरत गालापुरे क्रीडा शिक्षक - व्ही एस कायंदे, बी आर बोरोले, मार्गदर्शक- एस डी मोरे,ए वाय शिंगाणे व इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनींनी तिचे अभिनंदन व कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. [ads id="ads2"] 

  पुणे येथे असलेल्या जोग महाराज व्यायाम शाळेत कु रेणुका महाजनने   आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच व शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित दिनेश गुंड व त्यांचे चिरंजीव आंतरराष्ट्रीय खेळाडू पै आदर्श गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत केला.

 तिने पहिल्या फेरीत लातूर जिल्ह्यातील खेळाडूला 8.0 गुणांनी व चितपटीने विजय मिळवला व दुसऱ्या फेरीत तिने मुंबईच्या खेळाडूला 10.0 ने हरवले व तिने अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने डाव खेळून रेसलिंग कुस्त्या करून शालेय राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेत कांस्यपदक मिळवले. त्याबद्दल तिचे परिसरात कौतुक व अभिनंदन केले जात आहे. शुभेच्छा दिल्या जात आहेत.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️