लोककलावंत प्रबोधन प्रतिष्ठान, महाराष्ट्र च्या राज्य कार्यकारणी वर संचालक पदी शिंदी च्या सुनीता खरात यांची निवड


बुलढाणा (सुवर्ण दिप वृत्तसेवा) 

महाराष्ट्रभर प्रचलित असलेल्या विविध पारंपारिक लोककला,त्यांचे जतन, संवर्धन,संशोधन, सादरिकरण करणारे लोककलावन्त यांचे राज्यव्यापी लोककलावंतांचे संगठन म्हणजे लोककलावंत प्रबोधन प्रतिष्ठान,महाराष्ट्र या राज्यस्तरीय संघठनेच्या राज्य कार्यकारणी महिला संस्थापक संचालक  म्हणून सिंदखेड राजा तालुक्यातील शिंदी येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तथा महामानव लोककला अकादमी च्या बुलडाणा जिल्हा महिला संघटक सौ सुनीता रामेश्वर खरात यांची पुणे येथील राज्य कार्यकारणी सभेत निवड   करण्यात आली आहे.[ads id="ads1"] 

व्यसनमुक्ति अभियान प्रवक्त्या सौ सुनीता खरात ह्या बलिराजा सामाजिक संस्था, शिंदी च्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून विविध सामाजिक समस्या व शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनाचा प्रचार व प्रासार करीत आहेत.  विविध उपक्रम व कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजक म्हणून जनमानसात  जिल्हाभर परिचित आहेत. बलिराजा संस्था च्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून प्रबोधनात्मक प्रचार प्रसाराचे कार्य करित आहेत,तसेच ते शासनाच्या लोककलावन्त मानधन योजनेचे पात्र कलावन्त यांना लाभ मिळवून देणारी मार्गदर्शक जिल्हा कलावन्त संस्था महामानव लोककला अकादमी,बुलडाणा च्या आजीव सदस्य आहेत.[ads id="ads2"] 

लोककलेच्या बद्दल ची आवड़ व व्यासंग् लक्षात घेऊन लोककलावन्त प्रबोधन प्रतिष्ठान,महाराष्ट्र चे कार्याध्यक्ष शाहिर डी आर इंगले यांचे शिफ़ारशिने लोककलावन्त प्रबोधन प्रतिष्ठान, महाराष्ट्र  चे संस्थापक अध्यक्ष  शाहिर सम्राट सुभाष गोरे,(सोलापुर), संस्थापक सचिव शाहिर बालासाहेब मालुसकर(पुणे) राज्य कार्याध्यक्ष शाहिर डी आर इंगले(बुलडाणा) यांनी  सौ सुनीता रामेश्वर खरात यांची राज्याच्या कार्यकारणी संचालक म्हणून निवड केली आहे.

हेही वाचा :- प्रसिद्ध अभिनेत्रीला मुंबईत अटक; हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पोलिसांनी केला पर्दाफाश

हेही वाचा :- जनधन बँक खाते असणाऱ्यांसाठी खुशखबर :  जनधन बँक खाते  असेल तर मिळणार "इतके" रुपये

सम्पूर्ण महाराष्ट्र भर जिल्हा,तालुका व गाँवोगावी महिला लोककलावंताना संघठित करून कार्यकारणी गठित करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी देण्यात आलेली आहे.

सदर महत्वपूर्ण राज्य कार्यकारणी संचालक पदी निवड झाल्यामुळे सौ सुनीता रामेश्वर खरात यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️