मोताळा तालुक्यातील निपाणा येथे वीज कोसळल्याने घरातील साहित्याचे नुकसान



मोताळा तालुक्यातील निपाणा येथे १५ एप्रिल रात्री १० ते ११ वाजता रिमझिम पाऊसाने विजांचा कडकडात होत असताना रात्री मंगेशसिंह कमलसिंह ठाकूर यांच्या घरावरती  वीज कोसळल्याने या दुर्घटनेत मंगेशसिंह ठाकूर व पत्नी यांच्या पाठीला दुखापत झाली असुन ठाकूर यांना मुका मार लागला आहे.तर घरातील टिव्ही पंखा कपाट फ्रिज व इतर साहित्याचें मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.[ads id="ads1"]  

  १५ एप्रिल रात्री पासुनच जोरदार वादळ वाऱ्यासह   १०ते ११ च्या दरम्यान विजांचा कडकडीत होत असताना मंगेशसिंह ठाकूर यांच्या घरावर विज कोसळल्याने घरातील साहित्याचे नुकसान झाले सुदैवाने जिवीतहानी झाली नाही.तसेच रावेर तालुका  मनसेचे अध्यक्ष संदिपसिंह राजपूत यांना देखील पाहाणी केली असता  त्यांनी शासनाने  तात्काळ मदत करण्याची मागणी केली आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️