भारत सरकार रेल्वे विभाग यांनी दिव्यांगांसाठी पुढाकार घेऊन तातडीने योजना सुरू करावे.. आ. बच्चूभाऊ कडू

 


रावेर तालुका प्रतिनिधी - विनोद हरी कोळी

भारतीय रेल्वे विभाग भारत सरकार रेल्वे प्रबंधक मुंबई यांच्या सोबत आमदार बच्चूभाऊ कडू यांनी दिव्यांग बांधव संदर्भात बैठक घेतली आमदार बच्चूभाऊ कडू यांनी 25ते वर्ष संघर्ष करून दिव्यांग मंत्रालय आणून आपल्या वर 350च्या वर मोठे मोठे गुन्हे दाखल करून दिव्यांग साठी लढत राहिले लढा न सोडता आणखी लढा त्रिव्य करून मोठे मोठे संघर्ष करून मंत्री मंडळ सोबत वर्षानुवर्षे बैठक घेऊन सतत पाठपुरावा करून दिव्यांग दिन 3 डिसेंबर 2022 रोजी सर्वात मोठी घोषणा करण्यात आली होती की आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या अथक प्रयत्नाने दिव्यांग मंत्रालयाची स्थापना करण्यात आली तसेच दिव्यांग मंत्रालय चा कामकाज सुरू करण्यात आले.[ads id="ads1"] 

   आता दिव्यांगाणा रेल्वे मध्ये व विभागामार्फत चांगले सोयीसुविधा उपलब्ध करण्यात यावे व दिव्यांगाणा सुरक्षा मदत करण्यासाठी रेल्वे विभागाने मदत करावी व चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करावे त्या संदर्भात आमदार बच्चूभाऊ कडू यांनी रेल्वे विभाग प्रबंधक पोलीस विभाग मुख्य अधिकारी यांच्या सोबत बैठक घेतली त्यावेळी रेल्वे विभागाचे अधिकारी व कर्मचारी व पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते त्यावेळी सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा करून संबंधित विषयावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकारी यांना निर्देश देण्यात आले.[ads id="ads2"] 

   लवकरच प्रश्न मार्गी लागतील असे बैठकीत सांगण्यात आले त्यावेळी प्रहार  दिव्यांग क्रांती संस्था अध्यक्ष बापूराव काने, महाराष्ट्र संपर्क प्रमुख रामदास खोत, प्रहार दिव्यांग रेल्वे प्रवासी संघटना चे अजित सिंह रावत व पदाधिकारी कार्यकर्ते व संबंधित विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️