अवैध वाळू प्रकरणी रावेर तहसीलदारांनी दिले सावदा येथील महसुली अधिकाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन !

अवैध वाळू प्रकरणी रावेर तहसीलदारांनी दिले सावदा येथील महसुली अधिकाऱ्यांवर  कारवाईचे आश्वासन !

सावदा प्रतिनिधी (युसूफ शाह)

सावदा शहर व परिसरात स्थानिक महसुली अधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून मोठ्या प्रमाणात वाहनांच्या मदतीने राजेरोसपण अवैधरित्या वाळू येते.तरी हा प्रकार वेळोवेळी समक्ष भेटून पुराव्यानिशी येथील तलाठी शरद पाटील व मंडळ अधिकारी वानखेडे यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर सुद्धा आज तगायत याबाबत त्यानी काही एक कारवाई केली नाही.[ads id="ads1"] 

  सदरील महसुली अधिकाऱ्यांचे वाळू तस्करांशी अर्थपूर्ण संबंध असल्याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात शहरात व थेट तलाठी कार्यालय समोरच सुरू असलेल्या नविन बांधकाम ठिकाणी अवैध वाळू सहज येवूच शकत नाही.अशी चर्चा नागरिकांमध्ये चर्चीला जात आहे. 

तसेच शहरात मोठ्याप्रमाणात येत असलेली अवैध वाळूवर प्रतिबंध लावण्यासाठी सावदा तलाठी व मंडळ अधिकारी अजिबात काही कारवाई करीत नसून,त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावे,याबाबत दि.१३ एप्रिल २०२३ रोजी रावेर तहसीलदार बंडू कापसे यांना शेख फरीद शेख नुरोद्दीन यांनी समक्ष भेटून पुराव्यानिशी तक्रार दिल्यानंतर सुद्धा सदरील अधिकांऱ्यांवर काही एक कारवाई  झाली नाही,तसेच शहरात अवैध वाळू येणे देखील अजीबात थांबलेली नाही.[ads id="ads2"] 

  सबब सदरची तक्रारवर काय कारवाई केली, यासाठी आज दि.२७ एप्रिल रोजी तक्रारदार शेख फरीद यांनी रावेर तहसीलदारांना समक्ष भेटून चर्चा केली असता,सदर प्रकरणी चौकशी करून लवकरच संबंधितांवर योग्य ती कारवाई  करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी तक्रारदारास दिले.

"मात्र येत्या काही दिवसांत सावदा तलाठी शरद पाटील यांची बदली व पदोन्नती देखील होणार असल्याचे समजते,तरी सदर प्रकरणी त्याच्यासह मंडळ अधिकारी यांच्यावर रावेर तहसीलदार कार्यालयातून तात्काळ कारवाई होईल की,त्यांचे(डिपार्टमेंटली फेवर) केले जाते?याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे."

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️