बुलढाणा/प्रतिनिधि
कलेला कुठल्याही जात, धर्म,क्षेत्र यांच्या सिमा नसतात.कला मनोरंजनातून प्रबोधन करत करत सर्वदूर पोहचत असतात.कला रसिकांच्या आवडिने सर्व सीमा पार करून आनंद मिळूऊन देतात त्यामुळे त्याची मागणी कुठेही कधीही होऊ शकते यानुसार बुलडाणा जिल्ह्याचे सुप्रसिद्ध प्रबोधनकार तथा युवा लोककलावन्त लोकशाहीर गजेंद्र गवई यांचा प्रबोधनात्मक जनजागृती कार्यक्रम थेट पश्चिम महाराष्ट्रातील सोलापुर जिल्ह्यात नुकताच संपन्न झाला.[ads id="ads1"]
लोककलावन्त प्रबोधन परिषद,महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्राचे ख्यातनाम शाहिर सम्राट सुभाष गोरे दादा यांचे मार्गदर्शनाखाली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती महोत्सवा निमित्ताने जवळा ता सांगोला जिल्हा सोलापुर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडल,जवला यांचे वतीने बुलडाणा जिल्ह्याचे लोककला अभ्यासक लोकशाहीर गजेंद्र गवई सह सुप्रसिद्ध गायिका अस्मिता बनसोडे,जेष्ठ कविवर्य कवीश्वर अवचार यांच्या पहाड़ी आवाजातिल प्रबोधनात्मक व-हाडी कार्यक्रम "क्रांतिचा नारा.. मी वादळ वारा " प्रचंड प्रतिसादात सादर करण्यात आला.[ads id="ads2"]
पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा आपल्या वैधर्भिय व-हाडी भाषेतील अनेक भीमगिताना प्रचंड दाद मिळते.. महा आबा म्हणी बाप..महा बाप म्हणतो बाप..मी ही म्हणतो बाप..मव्ह पोरग म्हणते बाप ...अस शोधून पहा जगात..अस हाय का कुणाच कुणाशी मह्या भीमा सारख नात .... , मह्या भिमान माय सोन्यान भरली वटी... , झाला सग्याहून सगा नाही ठेवली त्यान जागा.. अशी अनेक गाजलेली गाणी लोककवि कवीश्वर अवचार, शाहिर गजेंद्र गवई व गायिका अस्मिता बनसोडे यांनी बहारदार पणे सादर करून रसिकांची मने जिंकली ..बुलडाणा चा पहाड़ी आवाज सोलापुर मध्ये गाजल्या गेला..
सदर कार्यक्रमास सहकलाकार , संगीत साथ बैंजो संदीप बोदड़े, ढोलक अशोक जावळे,तबला भारत अवचार, मंजीरा संतोष बळी, दिमड़ी सिद्धार्थ गवई यांनी दिली.
कार्यक्रमास बहुसंख्य समाजबाँधव उपस्थित होते..स्थानिक उत्सव मंडल पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जबरदस्त असे निययोजन व व्यवस्थापन केले होते.