केंद्रीय विद्यालय उमवि जळगाव येथे नाशिक विभागीय बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन


जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) - केंद्रीय विद्यालय संगठन नवी दिल्ली च्या मार्फत नाशिक विभागीय बॅडमिंटन स्पर्धेचे आज केंद्रीय विद्यालय कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मध्ये उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राजेश जावळेकर डायरेक्टर, इनोवेशन इंक्युबेशन अँड लींकेजेस कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव तर अध्यक्ष म्हणून केंद्रीय विद्यालय चे प्राचार्य मॅथ्यू अब्राहम होते. [ads id="ads1"] 

उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे जावळेकर सर यांनी खेळाचे महत्व सांगून मुलांना प्रोत्साहित केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. अध्यक्षस्थानी असलेले केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य यांनी केंद्रीय विद्यालय संगठन मार्फत घेण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या स्पर्धा, ऍक्टिव्हिटी आणि खेळांच्या स्पर्धा याविषयी माहिती दिली. या स्पर्धेमध्ये नाशिक विभागात येणाऱ्या केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविलेला आहे. [ads id="ads2"] 

  या स्पर्धेमध्ये निवडले गेलेले विद्यार्थी पुढे राज्यस्तरावर होणाऱ्या स्पर्धेवर जातील. या बॅडमिंटन स्पर्धेत केंद्रीय विद्यालय उमवि जळगाव आयोजक शाळा असून स्पर्धेचे उत्तम नियोजन प्राचार्य मॅथ्यू अब्राहम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे. तसेच आयोजक शाळेतील विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका प्रीती सोज्वळ यांनी केले. या कार्यक्रमासाठी मीनाक्षी राजेश पाटील मॅडम, विद्या हिवराळे मॅडम तसेच शाळेतील शिक्षकांनी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️