यावल ( सुरेश पाटील)
जळगाव येथे महामार्गावर इच्छादेवी मंदिराजवळ तांबापुरा फलकाच्या जवळ आता आज दि.19 बुधवार रोजी सकाळी 5:30 वाजेच्या सुमारास सुसाट वेगाने धावणाऱ्या डंपरने जळगाव महानगरपालिकेच्या डॉग कॅचिंग वाहनाला( मोकाट कुत्रे पकडणारे वाहन) जोरदार धडक देऊन वाहनाचे दोन तुकडे केले तसेच महामार्गावरील डिव्हायडरचे व इलेक्ट्रिक पोलचे मोठे आर्थिक नुकसान केल्याची घटना घडली या घटनेत बरेच जण जखमी झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.[ads id="ads1"]
घटनेच्या ठिकाणी उपस्थित सर्व नागरिकांकडून सुसाट वेगाने वाहतूक करणाऱ्यां डंपर वाहनाबाबत (डंपरवर वाहन क्रमांक दिसू नये म्हणून डंपर चालक मातीचा लेप लावून ठेवतात) तसेच या सुसाट वेगाने धावणाऱ्या डंपर वाहनांकडे पोलीस व आरटीओ विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहे, यात मात्र शासकीय यंत्रणेचे आर्थिक मोठे नुकसान झाले, अपघात ग्रस्त नागरिकांना मोठी आर्थिक,शारीरिक, मानसिक झळ बसली आहे.[ads id="ads2"]
महामार्गावर झालेल्या डिव्हायडरचे नुकसान आणि इलेक्ट्रिक पोलचे नुकसान लक्षात घेता डंपर मालका विरुद्ध गुन्हा दाखल होऊन झालेले आर्थिक नुकसान वसूल करण्यात यावे अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.