लाचखोर तलाठी आणि कोतवाल एसीबीच्या सापळ्यात; या कामासाठी घेतली लाच ; जळगाव जिल्ह्यातील घटना


 जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील भोरटेक बुद्रुक येथील लाचखोर तलाठी आणि कोतवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सापळ्यात सापडले आहेत. सलीम अकबर तडवी (वय-४४ वर्ष, तलाठी, सजा निंभोरा व प्रभारी चार्ज मौजे भोरटेक बु ll, तलाठी कार्यालय, ता.भडगाव जि. जळगाव) आणि कविता नंदु सोनवणे (वय २७ वर्ष, महिला कोतवाल, मौजे भोरटेक बु तलाठी कार्यालय ता. भडगाव जि. जळगाव) अशी लाचखोरांची नावे आहेत.[ads id="ads1"]  

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, एका शेतकऱ्याची वडीलोपार्जित शेतजमिन भोरटेक बुll ता.भडगाव तलाठी कार्यालयाचे हद्दीमध्ये आहे. शेतकऱ्याचे वडील मयत झालेले आहेत. सदर शेत जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर या शेतकऱ्यासह घरातील अन्य ०९ असे एकुण १० वारसांची नावे लावणे व तशी नोंद घ्यायचे होते. या कामाच्या मोबदल्यात तलाठी तडवी आणि कोतवाल सोनवणे यांनी २५०० रुपये लाचेची मागणी केली. [ads id="ads2"]  

  त्यापैकी दोघा लाचखोरांनी या शेतकऱ्याकडून जागेवरच १,००० रुपये घेतले. उर्वरीत रक्कम १५०० रुपये लाच रकमेची मागणी केली. त्यानंतर या शेतकऱ्याने एसीबीशी संपर्क साधला. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. त्यात लाचखोर तलाठी आणि कोतवाल हे दोन्ही रंगेहाथ सापडले. आता दोघांविरुद्ध भडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

सापळा व तपास अधिकारी-

श्री.शशिकांत पाटील, पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि. जळगांव. मो.नं. 8766412529

सापळा पथक

पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.राकेश दुसाने.

कारवाई मदत पथक

स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहिरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्दन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.बाळु मराठे, पो.कॉ.प्रदिप पोळ , पो.कॉ.सचिन चाटे, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर

मार्गदर्शक

*1)* मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. मो.नं. 93719 57391

*2)* मा.श्री.एन.एस.न्याहळदे साो., अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. मो.नं. 9823291148

*3)* मा.श्री.नरेंद्र पवार साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. मो.नं. 9822627288


*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*

अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव. अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव

@ दुरध्वनी क्रं. 0257-2235477

@ मोबा.क्रं. 8766412529

@ टोल फ्रि क्रं. 1064

Jalgaon ACB Trap bribe Corruption


जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️